अनुसूचित जमाती आरक्षणासाठी बंजारा समाज बांधव एकवटले! 👉बार्शिटाकळी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन: तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन......
अनुसूचित जमाती आरक्षणासाठी बंजारा समाज बांधव एकवटले!
👉बार्शिटाकळी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन: तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- महाराष्ट्र राज्यातील बंजारा जमातीला हैदराबाद गॅझेट व सी. पी. ॲड बेरार प्रोव्हिसमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे. यासाठी १७ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बार्शिटाकळी तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र राज्य बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने हजारो बंजारा समाज बांधत व पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी गोर बंजारा समाजाच्या महिला व पुरुषांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
बंजारा समाज अनुसुचित जमातीचे आरक्षणाकरिता पात्र ठरतो; परंतु बंजारा समाज आजही अनुसूचित जमातीचे आरक्षणापासून वंचित असल्याने अन्याय झालेला आहे. त्यामुळे बंजारा समाजामध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. उपरोक्त जिल्ह्यातील बंजारा जमातीसह महाराष्ट्र राज्यातील इतर सर्व जिल्हयातील बंजारा जमातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. अशा स्वरूपाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना बार्शिटाकळी तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी भर पावसात हजारोंच्या संख्येने बंजारा समाजातील पुरुष व महिला उपस्थित होत्या.
आमदारांच्या वक्तव्याचा निषेध
अनुसूचीत जमातीमध्ये कोणालाही समाविष्ट करू नये, या आमदार हरीश पिंपळे यांच्या वक्तव्याचा आंदोलनस्थळी निषेध करण्यात आला. आमदारांला तांडा बंदी करावी अशी मागणी बंजारा समाजाचे नेते सरपंच संघटणेचे अध्यक्ष गोपाल चव्हाण यांनी आंदोलनस्थळी आपल्या भाषणातून केली. अनेक चंजारा समाज बांधवानी समर्थन व्यक्त केले. भाजप समर्थकक बंजारा बांधवानी विरोध केला. त्यामुळे आंदोलन स्थळी वादावादी झाली आणि दुपारी दोन वाजताच आंदोलन संपुष्टात आले.
पातूर येथे बंजारा बांधवांचे निवेदन
पातूर : महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी बंजारा आरक्षण कृती समिती, पात्तूर यांच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन पाठविण्यात आले. हे निवेदन तहसील कार्यालयात नायब तहसीलदार श्रीकांत घुगे यांनी स्वीकारले. या प्रसंगी समाजाच्या वतीने अनिल जाधव, संतोष राठोड, कमलसिंग राठोड, गोविंद चव्हाणा प्रकाश चव्हाण, अनिल राठोड, विक्रम जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते. इतिहास व कायदेशीर दाखले असूनही महाराष्ट्रात बंजारा समाज आरक्षणापासून वंचित आहे, याबद्दल समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली.
Comments
Post a Comment