अकोला जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रावर डाटा एन्ट्री ऑपरेटरची नेमणूक करा -संघटनेच्या अध्यक्ष संगीता जाधव यांची मागणी.....

अकोला जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रावर डाटा एन्ट्री ऑपरेटरची नेमणूक करा -संघटनेच्या अध्यक्ष संगीता जाधव यांची मागणी 
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना करावी लागतात अनेक प्रकारच्या डाटा एन्ट्री अकोला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रावर डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची नेमणूक करा अशा मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला श्रीमती अनिता मेश्राम मॅडम यांना महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील आरोग्य सेविका , सेवक,ग्रामीण भागात आरोग्य सेवा देतात, आरोग्य विभाग हा अतिदक्षतेचा विभाग असून कुठल्याही प्रकारचे कर्तव्य जबाबदारीत काटकसर राहणार नाही याची सुद्धा आरोग्य विभागाच्या कार्यालयातून त्या बाळगून सर्व संवर्ग तांत्रिक पद्धतीने कर्तव्य जबाबदारी पार पाडण्याची मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेले आहेत परंतु गेल्या कित्येक वर्षापासून विविध संगणक कामे अन्यायकारक लादुन वरिष्ठांच्या स्थानिक प्रशासनाच्या सक्तीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन धोक्यात आलेले आहे व जवळपास 50 पेक्षा जास्त प्रकारच्या डाटा एन्ट्री लादलेल्या आहेत उपकेंद्र स्तरावर कम्प्युटर प्रिंटर उपलब्ध करण्यात आलेले आहेत परंतु त्यांना हाताळण्याकरिता डाटा एन्ट्री ऑपरेटर उपकेंद्र स्तरावर भरण्यात आलेले नाही आरोग्य कर्मचारी ऑपरेटर सारखे कामे करत आहे त्यामुळे आरोग्य सेवा सुद्धा ग्रामीण भागातील प्रभावित होत आहे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शासनाने तळागळाला आरोग्यसेवा देण्याकरिता नियुक्ती केलेले आहे परंतु त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून प्रशासनाकडून वेगवेगळ्या डाटा एन्ट्री करण्यास सक्ती करण्यात येत आहे ही अतिशय अन्यायकारक व गंभीर बाब आहे असे संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संगीता जाधव यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. उपकेंद्र स्तरावर एक ऑपरेटर नेमून देण्यात यावा ही विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष संगीताताई जाधव, जिल्हा सल्लागार वृंदा ताई विजयकर, जिल्हा सदस्य, मंगला भगत, जिल्हा सहसचिव अनिता इंगळे, जिल्हा मार्गदर्शक महादेव तायडे, जिल्हा सह उपाध्यक्ष श्रीमती क्षमाताई बायस्कर, हजर होत्या 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....