आदिवासी समाजाला जातीवाचक शिवीगाळ.... 👉सोशल मीडियावर अपमानास्पद भाषेचा वापरः पोलिसात तक्रार....
आदिवासी समाजाला जातीवाचक शिवीगाळ....
👉सोशल मीडियावर अपमानास्पद भाषेचा वापरः पोलिसात तक्रार
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- सोशल मीडियावर अपमानास्पद भाषेचा वापर करत आदिवासी समाजाला जातिवाचक शिवीगाळ केली. संबंधित दोषीवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करावेत, अशा प्रकारची तक्रार २१ सप्टेंबर रोजी बार्शिटाकळी पोलिसात सकल आदिवासी समाजाच्यावतीने देण्यात आली आहे.
तक्रारीत नमूद केले की, १८ सप्टेंबरला इंस्टाग्राम आयडी या सोशल मीडियावरून सोहम पवार या अकाउंटधारकाने आदिवासी समाजाला अपमानास्पद भाषेचा वापर करत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून समाजात तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच फेसबुकवरही एका व्यक्तीने तशा प्रकारचा प्रयत्न केला आहे. यामुळे संबंधित दोषींवर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९, ॲट्रॉसिटी ॲक्ट व भारतीय दंड संहिता १५३ (अ), २९५(अ), ४९९, ५००, या आदिवासी ॲट्रॉसिटी २००० अन्वये गुन्हे दाखल करावे, इंस्टाग्राम पोस्ट हटवावी, तपास करून दोषीवर तत्काळ कठोर कारवाई करावी, असेही तक्रारीत नमूद केले आहे. ही तक्रार बार्शिटाकळी पोलिसात सकल आदिवासी समाजाचे गणेश झळके, नारायण लोखंडे, नारायण करवते, गजानन ठाकरे, आकाश शेळके, अविनाश पंधरे, योगेश कुरसुंगे, शंकर मरसकोल्हे यांच्यासह अनेक नागरिकांनी केली आहे.
Comments
Post a Comment