अतिवृष्टी / पुरामुळे अकोला जिल्हयासह मुर्तिजापुर -बार्शिटाकळी मतदार संघात नुकसान भरपाईची आमदार पिंपळे यांची मागणी;.....

 अतिवृष्टी / पुरामुळे अकोला जिल्हयासह मुर्तिजापुर -बार्शिटाकळी मतदार संघात नुकसान भरपाईची; आमदार पिंपळे यांची मागणी.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी मतदार संघात झालेल्या शेती व शेतपिकांचे आर्थिक नुकसानीचे सर्वेक्षण पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी आर्थिक मोबदला देण्याबाबत.
दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी अकोला जिल्हयासह  मुर्तिजापुर-बार्शिटाकळी मतदार संघात प्रचंड अतिवृष्टी होऊन अतिवृष्टी व पुरामुळे खरिप पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेलेली आहेत. तसेच बऱ्याच ठिकाणी जमिनी खरडुन गेल्याने शेतीचे सुध्दा नुकसान झालेले आहे. स्थानिक नदी नाल्यांना आलेल्या महापुरामुळे शेतकी पिकाशिवाय नागरी वस्तीत सुध्दा पुराचे पाणी शिरुन नागरी वस्तीतील घरांचे नुकसान झालेले आहेत. नदी नाल्यांच्या महापुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे रस्ते व पुल क्षतीग्रस्त झाले असल्यामुळे सदरचे बाधीत रस्ते व पुल यांची दुरुस्ती / बांधकाम करणे अंत्यत गरजेचे आहे.
तरी दि. २६ सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी / पुरामुळे अकोला जिल्हयासह मुर्तिजापुर-बार्शिटाकळी मतदार संघात झालेल्या शेती व शेतपिकाचे आर्थिक नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी आर्थिक मौबदला देणे तसेच क्षतीग्रस्त झालेल्या रस्ते व पुल दुरस्ती / बांधकामासाठी आवश्यक सर्वेक्षण करुन निधीची उपलब्धता करुन देणेबाबत सर्व संबधीत विभागांना तसेच क्षेत्रिय अधिकाऱ्यांना तातडीने आदेशित करावे असी मागणीचे पत्र आमदार हरिशभाऊ पिंपळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे