बार्शिटाकळी तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्याची मागणी..... 👉शेतकरी संघर्ष समितीचे निवेदन : १ ऑक्टोंबर रोजी मोर्चा.....

बार्शिटाकळी तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्याची मागणी.....
👉शेतकरी संघर्ष समितीचे निवेदन : १ ऑक्टोंबर रोजी मोर्चा.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :-  तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग यांसारखी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अपरिमित आहे. परंतु शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अतिवृष्टी मदत यादीत बार्शिटाकळी तालुक्याचा समावेश न करता शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे शेतकरी बांधव प्रचंड संकटात सापडलेआहेत. त्या अनुषंगाने शेतकरी संघर्ष समितीने शासनाकडे, शेतकरी हिताच्या मागण्या केल्या त्यामध्ये बार्शिटाकळी तालुक्याचा तात्काळ
अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी. शेतकऱ्यांना पीकविमा, कर्जमाफी व इतर शासकीय योजनांचा त्वरित लाभ द्यावा. या मागण्या तातडीने मान्य करून शेतकन्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी संघर्ष समिती व शेतकरी बांधवांना तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, याची नोंद घ्यावी.
शासनाच्या अन्याया विरोधात व वरिल मागण्यांसाठी दि. १ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, बार्शिटाकळी येथे शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. आज दि.२६सप्टेंबर १०२५ रोजी सदर निवेदन देतेवेळी असून, जिल्हाधिकारी यांनाही त्याची प्रत पाठविण्यात आली आहे. निवेदन देतावेळी रमेश बेटकर, गजानन म्हैसने, मेहफूज खान, रितेश चव्हाण, प्रकाश नंदापुरे, भूषण गायकवाड, भारत बोबडे, अन्सार खान, सै. फारुख, असद खान, सोहेल खान, मो. अझर मो. जुनेद  तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे गणमान्य नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे