पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे आर्थीक प्रलोभन देवुन जातीय तेढ व धार्मीक भावणा दुखावणारे ईसमांवर गुन्हा दाखल....
पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे आर्थीक प्रलोभन देवुन जातीय तेढ व धार्मीक भावणा दुखावणारे ईसमांवर गुन्हा दाखल.
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक श्री अर्चीत चांडक यांना माहिती मिळाली की, बार्शिटाकळी पोलीस स्टेशन हद्दीत ग्राम चोहोगांव या गावात काहीतरी प्रकार घडला आहे. अशा माहिती वरून सदर माहिती ची पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे पोलीस निरीक्षक प्रविण धुमाळ व पोलीस पथकाला ग्राम चोहोगांव येथे जाण्या बाबत सुचना दिल्या त्यानुसार पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे पोलीस निरीक्षक प्रविण धुमाळ व पोलीस पथकाने चोहोगांव येथे भेट दिली असता १० ईसम ज्यापैकी ७ पुरुष व ३ महिला हे येशु ची प्रार्थना करीत असतांना मिळुन आले. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उदभवु नये म्हणुन त्यांना पोलीस स्टेशन ला आणले.
पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथे फिर्यादी नारायण परशुराम करवते, वय ३४ वर्ष, व्यवसाय-शेती, रा. कोथळी बु. ता. बार्शिटाकळी जि. अकोला यांनी फिर्याद दिली की, दि. १७/०९/२०२५ रोजी मी सायंकाळी ०७/०० वा चे दरम्यान गावात हजर असतांना चोहोगाव येथील गजानन विश्वनाथ काळे यांनी हा मला म्हणाला की, तुमचे घरात सुरू असलेला कलह तसेच बिमारी यांचा त्रास कमी करून घ्यायचा असेल तर आमचे घरी हजर असलेले जॉयसी देशपांडे रा. इंदोरा भंडारमोहल्ला नागपुर व त्यांचे पती ऑगस्टीन देशपांडे हे ख्रिश्चन धर्मानुसार दुर करू शकतात तुम्ही माझे घरी प्राथनेला या तुमचा घरगुती त्रास व येणाऱ्या बिमाऱ्या कमी व नाहीसे होतील व तुम्ही ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करा धर्मांतर केल्यास तुम्हाला आम्ही १ लाख रू देतो, आणि तुला आमच्या धर्मात यावेच लागेल नाहीतर तुझे घरात सुरू असलेला कलह व बिमाऱ्या बऱ्या होणार नाहीत अशी धमकी दिली. व धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती करीत होता अशाच प्रकारे त्याच्या सोबत असलेले सहा इसम व तिन महीला त्यामधील काही इसम व काही महीला अनोळखी होत्या. हे सुध्दा येशु ची प्रार्थना कर तुझे सर्व बिमारी दुर होतील व तु आमचे खिश्चन धर्मात धर्मांतरन कर, फिर्यादी यांनी घाबरून रात्री ९/०० वा. पोलीसांना फोन केला त्यानुसार प्राप्त माहितीच्या आधारे वरील १० ईसम हे येशु ची प्रार्थना करतांना मिळुन आले. तरी जॉयसी ॲगस्टीन देशपांडे व ॲगस्टीन अरविंद देशपांडे दोन्ही जात ख्रिश्चन तसेच त्यांचे सोबत असलेले ६ पुरुष व २ महिला यांनी मला धर्मांतरन करण्याकरीता आर्थीक प्रलोभन देवुन आमच्या धार्मीक भावना दुखवुन धर्माच्या नावाखाली आमच्या जातीच्या लोकांमध्ये शत्रुत्व वाढीस लागेल व जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. अशा रिपोर्ट वरून कलम १९६(१), २९९, ३५१ (२) , ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि निलेश चाटे, पो.स्टे. बार्शिटाकळी हे करीत आहेत.
Comments
Post a Comment