छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवाडा. 👉बार्शीटाकळी तालुक्यात ग्रामसभा संपन्न.....
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवाडा
👉बार्शीटाकळी तालुक्यात ग्रामसभा संपन्न...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांचे जन्मदिन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीमध्ये महसूल सेवा पंधरवाडा साजरा करण्याबाबत शासनाचे शासन निर्णयान्वये निर्दे श आहेत. त्या अनुषंगाने या अभियानातील पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमात पांदन रस्ते विषयक मोहीम हाती घेण्यात आली असून श्रीमती वर्षा मिना, जिल्हाधिकारी अकोला व संदीप कुमार अपार उपविभागीय अधिकारी मूर्तिजापुर यांचे मार्गदर्शनाखाली बार्शिटाकळी तालुक्यातील ३५ गावामध्ये पांदन रस्ते विषयक शिवार फेरी सदर गावातील ग्राम महसूल अधिकारी तलाठी, ग्रामसेवक, महसूल सेवक, कोतवाल, पोलीस पाटील व स्थानिक नागरिकाच्या सहकार्याने पार पाडण्यात आली असून यामध्ये गाव नकाशावर असलेले व नसलेले दोन्ही प्रकारचे शेतपांदन रस्त्यांच्या यादी तयार करण्यात आल्या आहेत, दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी बार्शिटाकळी तालुक्यातील सर्व ८० ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने व शिवार फेरीमध्ये तयार करण्यात आलेल्या पाणद रस्त्याचे यादीस मान्यता देण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, सदर आयोजित ग्रामसभेमध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील प्रथम टप्प्यात निवडलेल्या ३५ गावामध्ये तयार करण्यात आलेल्या शेत, पाणद रस्त्याचे यादीचे ग्रामसभेमध्ये संबंधित ग्राम महसूल अधिकारी मार्फत वाचन करून त्यास ग्रामसभेची अंतिम मान्यता घेण्यात आली, सदर रस्त्याचे पुढील पाच दिवसात प्रथम मंडळातील निवडलेल्या एका गावातील शेत रस्त्याची भूमी अभिलेख विभागामार्फत सिमाकन करण्यात येऊन त्यावरील अतिक्रमण निष्काषित करण्यात येणार आहे, तरी सदर पहिल्या टप्प्यातील अभियानामध्ये स्थानिक नागरिकांनी ग्रामसभेत मंजूर पांदन रस्त्याचे भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी व सिमाकंन करून आपले रस्ते मोकळे करून घ्यावीत असे आव्हान तहसीलदार राजेश वझिरे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment