वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फ्री इंग्रजी क्लासेस चे उद्घाटन.!
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फ्री इंग्रजी क्लासेस चे उद्घाटन.!
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- वंचित बहुजन आघाडीचे बार्शिटाकळी शहर प्रसिध्दी प्रमुख अमित तायडे यांनी बार्शिटाकळी शहर व तालुक्यातील विद्यार्थ्या करीता फ्री इंग्रजी क्लासेस चे आयोजन केले,
या कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव मिलींद इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी या फ्री इंग्रजी क्लासेस ला प्रमुख उपस्थिती अकोला महानगरपालिकेचे माजी गटनेते गजानन गवई होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चे जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन, नगरपरिषद चे माजी गटनेते सुनिल शिरसाठ , शहराध्यक्ष अजहर पठाण, माजी नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, माजी रूग्ण कल्याण समिती सदस्य इमरान खान, अनिल धुरंधर, मा. युवा ता. अध्यक्ष अमोल जामनिक, श्री खंडारे, दादाराव जामनिक, सै.अन्सार, शहर महासचिव शुभम इंगळे, हजर होते
सदर कार्यक्रम ला जिल्ह्य़ाचे महासचिव मिलिंद ईंगळे यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित पालक यांना मोलाचे मार्गदर्शन केले,
सदर कोचिंग क्लासेस चे संचालक जाधव सर, हे या विद्यार्थ्यांना शिकवणार असुन आज दुपारी तीन वाजेपर्यंत 110 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती .
Comments
Post a Comment