विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांचेविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा... 👉बार्शिटाकळी तालुका अध्यक्षाचे ठाणेदारांना निवेदन.....
विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांचेविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा...
👉बार्शिटाकळी तालुका अध्यक्षाचे ठाणेदारांना निवेदन...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी शरदचंद्र पवार गटा चे ज्येष्ठ नेते माननीय जयंत पाटील यांचे संदर्भात काही बेताल आणि आश्चील भाषेत शिवीगाळ केली, गोपीचंद पडळकर यांनी आपल्या तोंडाला पट्टी बांधावी, सन्माननीय ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे एका राष्ट्रीय पक्षाचे ज्येष्ठ नेते असतानाही त्यांचा असा अपमान करणे, हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, साहेब, आणि अकोला जिल्ह्या ग्रामीण अध्यक्ष संग्राम भैया गावंडे, बार्शिटाकळी तालुक्याचे अध्यक्ष सतीश पाटील गावडे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे, अत्यंत वाईट भाषेचा वापर करून त्यांचा अपमान करण्यात आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे, याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांचे विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश पाटील गावंडे आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसारइतरांनी केली आहे,
विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे बाबत बेताल वक्तव्य केल्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे याबाबत राष्ट्रवादी तालुका काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, आणि अकोला अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे यांचे आदेशाने बार्शिटाकळी ठाणेदारांना गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे, आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन पोलीस स्टेशन समोर करण्यात आले आहे, याबाबत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला,
यावेळी बार्शिटाकळी पोलीस स्टेशन गध्ये तालुका अध्यक्ष सतीश पाटील गावंडे, आणि शहराध्यक्ष अय्याज भाई अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष प्राचार्य बिस्मिल्ला खान, आजी माझी सर्व पदाधिका-यासह बार्शिटाकळीचे ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये आमदार पडळकर यांनी बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांचे वर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सप्टेंबर २५ रोजी बार्शिटाकळीचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांना निवेदन देण्यात आले आहे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी असे बेताल वक्तव्य, यापुढे कदापिही करू नये, अन्यथा त्यांना याचा चांगला परिणाम भोगावे लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांच्या आदेशाने देण्यात आली आहे.
ठाणेदारांना निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विस्मिल्ला खान, तालुका अध्यक्ष सतीश पाटील गावंडे, शहराध्यक्ष अय्याज भाई, भाऊराव जाधव, बबनराव राऊत, जना ठोकळ, मुकेश इंगळे, यांचेसह तालुक्यातील आजी माजी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
Comments
Post a Comment