कलियुगात 5 वर्षाच्या चिमुकल्या उत्कर्ष क्षीरसागर ने केली एक उब जाणीवची ट्रस्टला केले ७११रु. ची मदत....
कलियुगात 5 वर्षाच्या चिमुकल्या उत्कर्ष क्षीरसागर ने केली एक उब जाणीवची ट्रस्टला केले ७११रु. ची मदत.....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- मंगरूळपीर आगरातील रवींद्र क्षीरसागर यांच्या उत्कर्ष क्षीरसागर लहान चिमुकल्या मुलाने . आपल्या बचत मधून जमा केलेले पैसे. एक उब जाणिवेची या ट्रस्टला देऊन आपल्या निरागसपणाचा एक आदर्श समाजाला दिला आहे.
एक वेळेस उत्कर्ष हा पोलिस स्टेशन कारंजा येथील श्री.गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी गेला असता तेथे उत्कर्षाच्या वडिलांचे मित्र जे पोलिस खात्यात नोकरीला आहे श्री. नरेंद्र खाडे यांची भेट झाली की जे बऱ्याच वर्षापासून एक उब जाणिवेची या ट्रस्ट च्या माध्यमातून गरजू लोकांना मदत करतात त्यावेळी उत्कर्षाच्या वडिलांनी त्याला सांगितले की जो KG2 ला RJC Kids कारंजा येथे शिक्षण घेतो त्याला सांगितले की,बाळा हे नरेंद्र काका आहेत हे गरजू लोकांना मदत करतात तेव्हा माझ्या मुलाने मला प्रश्न केला की "जे चांगलं कार्य नरेंद्र काका करतात त्यांना आपण पण मदत का करू शकत नाही?"
तेव्हा मी त्याला सांगितले की हो बाळा आपण पण मदत करू,तेव्हा त्याने म्हणजे माझ्या मुलाने त्याचा गल्ला का ज्यामध्ये तो थोडे थोडे पैसे टाकत होता मला फोडून मागितला आणि त्यामध्ये निघालेले 710 रुपये नरेंद्र काकांना द्या गरजू लोकांना मदत म्हणून असे सांगितले.
त्यानंतर मी त्यामध्ये माझ्याकडून 1 रुपया टाकून 711 रुपये श्री नरेंद्र खाडे साहेब(पोलिस) एक उब जाणीवेची याचे खात्यावर टाकले.
Comments
Post a Comment