निराधार वृद्धांना मदतीचा हात देऊन दिवाळी साजरी! 👉5 वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे....

निराधार वृद्धांना मदतीचा हात देऊन दिवाळी साजरी!
👉5 वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे
वृद्ध महिलेला साडी-चोळी व मिठाई देऊन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : तालुक्यातील चोहोगाव येथील इंगळे कुटुंबीयांनी दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त गरजू, अनाय, निराधार आणि वृद्ध नागरिकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला तसेच मुख्य दिवशी इंगळे कुटुंबीयांनी घरोघरी जाऊन कपडे, फराळ, मिठाई आणि किराणा किटचे वाटप केले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांची दिवाळी प्रकाशमय झाली. 

चोहोगाव (सायखेड) येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बबन इंगळे, आशा स्वयंसेविका छाया इंगळे, हिमांशू इंगळे, साक्षी इंगळे आणि कमलाबाई बोरकर हे उपक्रमाचे प्रमुख शिल्पकार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी दिवाळीपूर्वीच दुर्गम व आदिवासी भागांतील गरजू कुटुंबांची ओळख करून त्यांना मदत पोहोचवली जाते.

विविध स्तरातून कौतुक !
यंदाच्या उपक्रमाचा प्रारंभ २० ऑक्टोबर रोजी धाबा येथे करण्यात आला. यावेळी राजेश धाबेकर, उमेश करवले, अनिल तिप्पावाड, बलिवंत खंडारे आर्दीच्या उपस्थितीत जामवसू येथील एका वृद्ध महिलेला साडी-चोळी, फराळ व मिठाई देऊन उपक्रमास सुरुवात झाली. या कार्याचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार राजेश वजीरे, पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ, ग्रामविकास अधिकारी महेंद्र बोचरे, तालुका कृषी अधिकारी संध्या करवा, शिक्षण विभागाचे दिलीप आवटे, दुय्यम निबंधक अनिल काळे आदींनी कौतुक केले.


Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे