आश्वासने पूर्ण करा, अन्यथा जागा दाखवू - अक्षय राऊत यांचा शेतकरी मेळाव्यात सरकारला इशारा!

आश्वासने पूर्ण करा, अन्यथा जागा दाखवू - अक्षय राऊत यांचा शेतकरी मेळाव्यात सरकारला इशारा!
 बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : शहरातील अकोली वेस परिसरात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे आयोजन इमरानोद्दिन ग्यासोद्दिन व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. नुरसलीम जमदार यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा सुप्रसिद्ध युवा व्याख्याते शेतकरीपुत्र अक्षय राऊत उपस्थित होते.
या मेळाव्यात बोलताना अक्षय राऊत यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीबाबत सरकारवर प्रखर टीका केली. त्यांनी सांगितले की,“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून इतिहास घडविला होता. त्याची पुनरावृत्ती करून विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बरोबरी करून दाखवावी.”
राऊत यांनी पुढे म्हटले की, “संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५०,००० रुपये प्रति हेक्टरी मदत देण्यात यावी. सोयाबीनचे उत्पादन बाजारात येत असताना तातडीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, ओला दुष्काळ जाहीर करावा, आणि शेतकऱ्यांना दिलेली सर्व आश्वासने तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा जनता जागा दाखवून देईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ घोषणाबाजी नको, तर ठोस निर्णय घ्यावेत. हमीभाव कायदा लागू झाला पाहिजे, चोवीस तास वीज उपलब्ध झाली पाहिजे, आणि सोयाबीन-कापसाचे भाव वाढविले पाहिजेत.” राऊत यांनी काँग्रेस सरकारच्या काळातील शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आजच्या सरकारमधील तफावत स्पष्ट करत शेती क्षेत्राचा देशाच्या आर्थिक विकासात असलेला हातभार आहे असे अधोरेखित केले.
कार्यक्रमास महेफुज खान, ग्यासुद्दिन सरपंच साहेब, नाजिम शेठ, आलमगीर खान, बाळूभाऊ ढोरे, सै. फारुक, शेख अजहर, गुड्डू भाई, हसन शहा, संजय राजुरकर, सोहेल खान, नाना हिवराळे, अयाज सेठ, जाकिर इनामदार, असद अली, जैनुद्दिन भाई, असद केके, सोहेल हुसेन, अशिक अली, फिरोज बेपारी, शेख इस्माईल, शेख हुसेन, वसिमोद्दिन, अ. मोहसीन, एजाज बेग, सईद खान, इस्माईल खान, सै. वाजीद, सै. शारिक, एजाजोद्दिन जमदार, बबन ढेंगळे, संजय कुरोडे, अमोल अग्रवाल, शैलेश ढेंगळे, राजा, मोबिन, बाबू भाई, मुजाहीद खान, शेख मोबिन सर, मो. रिजवान, मो.जुनेद तसेच काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम राजुरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन इमरानोद्दिन यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे