बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या चर्चा दौऱ्याने - सुजात दादा आंबेडकर यांनी नवी ऊर्जा दिली...
बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या चर्चा दौऱ्याने - सुजात दादा आंबेडकर यांनी नवी ऊर्जा दिली
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी:- २०२५ च्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका - नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका - वंचित बहुजन आघाडीने गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी पिंपळखुठा रोडवरील प्रभु पार्वती मंगलकार्यालया मध्ये एका भव्य चर्चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुजात दादा आंबेडकर, राजेंद्र भाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे, महिला जिल्हाध्यक्षा आम्रपाली ताई खंडारे आणि युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे हे प्रमुख नेते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराची रणनीती, युवकांची भूमिका, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला बळकटी देण्याची प्रतिज्ञा केली.
यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष गोरशिग राठोड, अजय अरखराव, ज्येष्ठ नेते नइमोद्दीन शेख, गोबा शेठ, सैय्यद रागीब हाजी,अनुराधाताई ठाकरे, महिला तालुकाध्यक्षा वैशालीताई कांबळे, उज्ज्वलाताई गडलिग, सतिष पवार, भारत निकोशे, दादाराव पवार, दिनकर पातोंड, पांडुरंग आखरे, माजी नगरसेवक सुनील विठ्ठलराव सिरसाठ, श्रवण रामदास भातखडे, शहराध्यक्ष अझहर पठाण, श्रीकृष्ण देवकुणबी, दादाराव सुरडकर,निकी डोंगरे, दिनेश मानकर, सुनील वानखडे, स्वप्निल आखरे, इम्रान खान, अमोल जामनिक, सचिन आगाशे ,बार्शिटाकळी तालुक्यातील व शहरातील आजी माजी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment