हवामान संकटाचा मुकाबला : अकोल्यात नागरिक, संस्था व मनपाचा एकत्रित प्रयत्न.... 👉क्लायमेट ॲक्शन प्लानसाठी कार्यशाळेत सामूहिक चिंतन व दिशादर्शक निर्णय....

हवामान संकटाचा मुकाबला : अकोल्यात नागरिक, संस्था व मनपाचा एकत्रित प्रयत्न....
👉क्लायमेट ॲक्शन प्लानसाठी कार्यशाळेत सामूहिक चिंतन व दिशादर्शक निर्णय....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :-  हवामान बदल ही केवळ जागतिक समस्या नाही, तर प्रत्येक शहराच्या भविष्यासमोर उभी ठाकलेली तातडीची जबाबदारी आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नागरिक, संस्था आणि प्रशासन एकत्र आल्यासच परिणामकारक दिशा मिळू शकते. या उद्देशाने अकोला शहरात आयोजित कार्यशाळेतून ‘क्लायमेट ॲक्शन प्लान (CCAP)’ तयार करण्याचा मार्ग आखण्यात आला.अर्बन ऑक्टोबरचा भाग म्हणून कार्यशाळा.शहरी संकट प्रतिसाद, हवामान बदल आणि नागरी लवचिकता या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित कार्यशाळा युवा संस्था आणि अकोला महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘हॉटेल कृष्णा इम्पीरियल’ अकोला येथे आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा ‘अर्बन ऑक्टोबर – हैबिटॅट मंथ २०२५’चा भाग होती व संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अर्बन क्रायसिस रिस्पॉन्स’ या जागतिक उपक्रमाशी सुसंगत होती. या कार्यशाळेत बदलत्या पर्यावरणामुळे शहरांपुढे निर्माण होणाऱ्या संकटांचा, धोका झोनचा आणि जोखिम स्पॉट्सचा सखोल अभ्यास करण्यात आला. गटचर्चांच्या माध्यमातून या संवेदनशील ठिकाणांचे मॅपिंग करण्यात आले. हवामान बदलामुळे नागरी वस्ती, निवासस्थान आणि शहरांच्या लवचिकतेवर होणाऱ्या परिणामांचा ऊहापोह झाला.
मान्यवरांचे मार्गदर्शन व सहभाग
या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. विजय पारतवार (उपायुक्त, अकोला महानगरपालिका), डॉ. हर्षवर्धन देशमुख (पी.डी.व्ही.के.), श्री. सुरेश लुले (युवा संस्था), समाजसेवक गजानन हरणे, संघपाल वाहुरवाघ (पाणी फाउंडेशन), श्री. किशोर वीर, श्री. हरिहर बोचरे व ज्ञानेश्वर कर्वे (वृक्षसंवर्धन फाउंडेशन) तसेच श्री. हरीश शर्मा (ब्लू मोर्मन नेचर क्लब) यांचे मार्गदर्शन लाभले.
महानगरपालिका प्रतिनिधी, सामाजिक संस्था, संशोधक, युवक गट, शालेय शिक्षक, समुदाय नेते आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
क्लायमेट ॲक्शन प्लानकडे वाटचाल.कार्यशाळेतून अकोला शहरासाठी क्लायमेट ॲक्शन प्लान (CCAP) तयार करण्याचा निर्णय निश्चित झाला. हवामान बदलाशी लढण्यासाठी एकत्रित कृतीसाठी व्यासपीठ निर्माण झाले. कार्यशाळेच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीसाठी दत्ता भिसे, सचिन भुसारी, जीवन दुमाले, प्रतीक पवार, नीलू सराटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शहरांना ‘लवचिक’ बनविण्याची आवश्यकता आज कधी नव्हे इतकी तीव्र झाली आहे. अकोल्यासारख्या वाढत्या शहराला पूर, उष्णतेच्या लाटा, पाणीटंचाई आणि प्रदूषण यांचा गंभीर फटका बसतो आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी फक्त शासनाच्या धोरणांची नाही, तर नागरिकांच्या सहभागाचीही गरज आहे.या कार्यशाळेतून जो संकल्प उदयास आला तो केवळ दस्तऐवज न राहता प्रत्यक्ष कृती आराखडा म्हणून राबविला गेला, तरच अकोल्याचे भविष्य सुरक्षित राहील.शिक्षण, पर्यावरण आणि नागरी विकास यांचा संगम साधून शाश्वत शहर निर्माण करणे हीच खरी वेळेची हाक आहे.कारण शहर वाचले तरच पुढची पिढी वाचेल!

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे