ना शिधा, ना आनंद! गोरगरिबांनी चटणी-भाकर खाऊन दिवाळी साजरी करावी का? :– समाजसेवक गजानन हरणे,

ना शिधा, ना आनंद! गोरगरिबांनी चटणी-भाकर खाऊन दिवाळी साजरी करावी का? :– समाजसेवक गजानन हरणे, 
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : "गरीबाचे दिवाळीने दिवाळ काढले" अशी बोचरी प्रतिक्रिया यावर्षी समाजामध्ये उमटत आहे. कारण, दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांसाठी शासनाकडून मिळणारा आनंदाचा शिधा यंदा गायब झाला आहे. स्वस्त धान्य दुकानांतून फक्त ज्वारी व तांदूळ देण्यात आल्याने गोरगरिबांच्या ताटात दिवाळीच्या सणाला केवळ चटणी-भाकरच उरली आहे.गोरगरिबांना दिलासा देणारा दिवाळी शिधा यंदा थांबवल्याने सर्वसामान्यांच्या नाराजीला खतपाणी मिळाले आहे. मतदानाचा काळ असेल तर शिध्याचे वेगळे वाटप केले जाते. मात्र, यावर्षी राज्यात निवडणुका नसल्याने गरीब जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप समाजातून होत आहे.स्वतःला "हिंदूचे सरकार" म्हणवणाऱ्या भाजप-प्रणित फडणवीस सरकारने हिंदूंच्या पवित्र दिवाळी सणाला कोणतेही महत्त्व न देता गोरगरिबांना शेतकरी शेतमजुरांना अडचणीत आणले आहे, अशी तीव्र टीका विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच निर्भय बनो जन आंदोलन व राष्ट्रीय लोक आंदोलन यांच्या वतीने समाजसेवक गजानन हरणे यांनी केली आहे.
गोरगरिबांना त्यांच्या हक्काचा शिधा न देता, सणासुदीला आनंदापासून वंचित ठेवणे ही शासनाची अन्यायकारक भूमिका असल्याचे मत व्यक्त होत असून, शासनाने तात्काळ शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देणारा शिधा पुरवावा, तसेच अती पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना अशा प्रकारचा निर्णय फसवणूक सरकारने घेऊन जनतेची फसवणूक केली आहे. तरी शेतकरी मजूर गरिबांना दिलासा देण्याची मागणीही समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुख्यमंत्र्यांनकडे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे