बार्शिटाकळीत शेतकऱ्यांची काळी दिवाळी; चटणी भाकर खाऊन केले आंदोलन....

बार्शिटाकळीत शेतकऱ्यांची काळी दिवाळी; चटणी भाकर खाऊन केले आंदोलन....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
 बार्शिटाकळी :- दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी देश विदेशात सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना बार्शिटाकळीत मात्र चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली. शेतकरी एल्गार समिती बार्शिटाकळी यांच्या कडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या चटणी भाकर खाऊन, काळी दिवाळी साजरी करण्याच्या अभिनव अशा आंदोलनात, दिवाळीचा दिवस असूनही तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येने उपास्थित होते. यावेळी शेतकरी नेते प्रशांत गावंडे, सुप्रसिद्ध व्याख्याते अक्षय राऊत, किरण ठाकरे महादेव गावंडे, ॲड. महेश घनगाव, भारतभाऊ बोबडे,
शुभम राजुरकर, जनार्दन ठोकळ, भारत चांभारे, गणेश ताठे मंगेश अंधारे पंडित चांभारे, संतोष सोनटक्के जीवन राऊत गजानन मानतकर, अक्षय वैराळे, रुद्राक्ष राठोड, राजाबापू देशमुख श्रीकृष्ण जानोरकर, गोपाल भटकर, उमेश राऊत अविनाश ठाकरे, फारूकभाई यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थीत होते. शेतकरी एल्गार समितीच्या वतीने बार्शिटाकळी तहसील कार्यालय येथे चटणी भाकर खाऊन या सरकारचा निषेध करण्यात आला कारण की दुष्काळी मदत अजूनही खात्यात जमा झाली नाही. शेतकऱ्याला कर्ज माफी झाली नाही.
नाफेडची खरेदी अजून सुरू झाली नाही तसेच शेतकऱ्याला भावांतर फरक अजूनही भेटला नाही या विविध मागण्याकरीता आज दि.२१ ऑक्टोबर २०२५ ह्या दिवाळीच्या दिवशी, शेतकरी एल्गार समितीच्या वतीने हे करण्यात आंदोलन आले. निवासी तहसीलदार अतुल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व शेतकरी व पत्रकार उपस्थित होते. पोलिस निरिक्षक प्रवीण धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी बार्शिटाकळीचे प्रसिद्ध पत्रकार तथा वऱ्हाडी कवी व उद्योजक डॉ श्याम ठक यांच्या ''बाप वावर पेरते" ह्या वऱ्हाडी कवितेने आंदोलनाचा भाग होऊन शेतकऱ्यांच्या विषयी अत्यंत महत्त्वपूर्ण काही ओळी सांगितल्या. लावगणीचा आकडा खोटा हिसाब ठरते देणं अजूनही बाकी बाप वावर पेरते ह्या कवितेतील काही ओळी म्हणून डॉ शाम ठक यांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या....

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे