दारूच्या नशेत खाली पडलेल्या इसमाच्या अंगावरून गेले वाहन ! 👉सूरज वाइन बारसमोर घडला अपघात....

दारूच्या नशेत खाली पडलेल्या इसमाच्या अंगावरून गेले वाहन !
👉सूरज वाइन बारसमोर घडला अपघात
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी -: शहरातील सूरज वाइन बारमधून एक जण दारूच्या नशेत बाहेर निघाला. चालत जात असताना तो अचानक खाली पडला. यावेळी त्याच्या अंगावरून वाहन गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना २७ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यातील मृत व्यक्तीचे नाव अफसर खॉ रशिद खाँ (३३) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बार्शिटाकळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज वाइन बारसमोरच्या मोकळ्या जागेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती रविवारी मिळाली, तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, काळ्या रंगाचे कपडे घातलेला इसम मृतावस्थेत आढळून आला. चौकशीत मृतकाची ओळख अफसर खाँ रशीद खाँ (३३), रा. इंदिरा आवास बार्शिटाकळी अशी पटली. या प्रकरणी सूरज वाइन बारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रविवार, २६ ऑक्टोबर रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास अफसर खाँ हे बारमधून दारूच्या नशेत बाहेर येताना दिसत होते, त्याचवेळी बारचे मालक संतोष शंकरराव काळदाते आपल्या चारचाकी वाहनाने घरी निघत होते. नशेच्या अवस्थेत अफसर खाँ हे वाहनाच्या डाव्या बाजूने चालताना अचानक खाली पडले. त्याचदरम्यान बार मालक हे गाडीमध्ये बसून त्यांची गाडी वळवून जात असताना सदर मृतकाच्या अंगावरून गेली. सदर मृतक हा चालकाच्या गाडीच्या डाव्या बाजूस असल्यामुळे चालकास मृतक खाली पडलेला दिसला नसल्याने निष्काळजीपणाने त्यांनी गाडी चालविली त्यामुळे सदर मृतकाचा जागेवरच मृत्यू झाला असल्याचे बारच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. यावेळी घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी बार मालक संतोष काळदाते व त्यांची गुन्ह्यातील फोर व्हीलर क्रमांक एमएच ३० बीए ३०३० ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तसेच बारमधील कामगार दीपक बाळकृष्ण डोंगरे यांनी अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्याबद्दल त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात कलम १०६, २८१, २३९ भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बार्शिटाकळी पोलिसांकडून सरू आहे. 

शहरात विविध अफवांची चर्चा !

शहरात बार्शिटाकळी रविवारी सकाळी ६ वाजतापासून सदर मृत्यूबाबत विविध तर्क वितर्क लावून अफवा पसरल्या होत्या. परंतु १० वाजताच्या सुमारास जेव्हा पोलिस प्रशासनाकडून अपघाताच्या सदर ठिकाणच्या समोरील बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असतासत्य घटना समोर आली. यामध्ये बारचे मालक संतोष काळदाते आपल्या चारचाकी वाहनाने धरी निघत होते. नशेच्या अवस्थेत मृतक वाहनाच्या डाव्या बाजूने चालताना अचानक खाली पडला आणि वाहन वळविताना त्याच्या अंगावरून गेल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. यामुळे अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे