बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीची सभा....

बार्शिटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीची सभा....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर केली परंतु ती वितरित करण्याचा हुकूम मात्र अधिकाऱ्यांना दिला नाही, म्हणून म्हणतो अधिकाऱ्यांची वाहने फोडून काही फायदा नाही, वाहने फोडायची असतीलच तर सत्ताधारी आमदार व मंत्र्यांची फोडा, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (३० ऑक्टोबर) येथे जाहीर सभेत केला.
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून आधी ३१ हजार कोटी व नंतर वाढीव ११ हजार कोटी रुपये असे एकूण ४२ हजार कोटी मंजूर केले, मात्र वितरित करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत दिला नाही, ॲड प्रकाश आंबेडकर, म्हणाले भाजप सरकार केंद्राचे असो वा राज्याचे ते सर्व स्तरावर अपयशी झाल्याचा आरोप त्यांनी केला.
कार्यक्रमाला माजी आमदार ॲड. खतीब साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, प्रतिभा सिरसाट, बळीराम चिकटे, अनुराधा ठाकरे, आयोजक अशोक कोहर, मंदा अरुणराव देशमुख, तालुका कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड, ॲड. आशिष देशमुख, ॲड. गोपाल देशमुख, गोपाल चव्हाण, सतीष पवार, आशा ठाकरे व बार्शिटाकळी तालुक्यासह शहरातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक अशोक कोहर यांनी, संचालन ॲड सुमीत मोहोड यांनी केले तर आभार 
गोरसिंग राठोड यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे