बार्शिटाकळी न.पं. आरक्षण सोडतीत महिलांचे वर्चस्व.....

बार्शिटाकळी न.पं. आरक्षण सोडतीत महिलांचे वर्चस्व...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी, ता. ८ नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत नगरपंचायत सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडली.
या सोडतीसाठी संदीपकुमार अपार उपविभागीय अधिकारी, मुर्तीजापूर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तर राहुल कंकाळ मुख्याधिकारी, नगरपंचायत यांनी सोडतीसंबंधी नागरिकांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. या विद्यार्थ्यांमध्ये अनंत क्षीरस्वगर, अमन तायडे, शे. अपफान शे. राजु कुरेशी, अलिना अनम मो, साकीब, आमेना आयत खान आतोफ खान यांचा समावेश होता. सोडतीच्या प्रारंभी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर महिलांसाठी असलेले प्रवर्गीय आरक्षण निश्चित करण्यात आले.

महिलांचे वर्चस्व आणि बदलते राजकीय गणित

या वर्षीच्या आरक्षण सोडतीत महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, एकूण १७ पैकी ८ प्रभाग महिला प्रवर्गात मोडतात. त्यामुळे बार्शिटाकळी नगरपंचायतीच्या निवडणुकीत महिलांचे नेतृत्व आणि सहभाग निर्णायक ठरणार आहे. राजकीय पक्षांसाठी हे आरक्षण नवे समीकरण उभे करणार असून, पुढील काही दिक्सात उमेदवारांच्या चाचपणीसह प्रचाराची तयारी वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.


प्रभागनिहाय निघालेले आरक्षण

प्रभाग क्रं १ नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्र २ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रं ३अनुसूचित जाती
प्रभाग क्रं ४ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र ५ सर्वसाधारण
प्रभाग क्रं ६ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रं ७ सर्वसाधारण
प्रभाग क्र ८ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्रं ९ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र १० सर्वसाधारण
प्रभाग क्रं ११ अनुसूचित जाती महिला
प्रभाग क्रं १२ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्रं १३ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रं १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्र १५ सर्वसाधारण
प्रभाग क्र १६ नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्रं १७ सर्वसाधारण 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे