"चला एकतेसाठी चालु या" बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचा उपक्रम......

"चला एकतेसाठी चालु या" बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचा उपक्रम....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण धुमाळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ३१ आक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता रन फॉर युनिटी ३ किलोमीटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते 
हि रॅली बार्शिटाकळी पोलीस स्टेशन येथुन पोलीस निरीक्षक श्री प्रविण धुमाळ यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन सुरूवात केली .
सदर रॅली अकोली वेस मज्जीद जवळुन, सोमवार पेठ, भोईपुरा, जामा मज्जीद, शिवाजी चौक, बाजार लाईन, उर्दू शाळा, नगरपंचायत चौक, संताजी नगर, आठवडी बाजार मार्गे पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आली या रॅलीत पोलीस उपनिरीक्षक श्री चाटे साहेब, माजी नगरसेवक श्रावण भातखडे, संजय इंगळे, गोपाल महल्ले, संकेत राठोड, अनंता केदारे, दिनेश रत्नपारखी, मदन धात्रक, राजेश साबळे, सौरभ अग्रवाल, आकाश धात्रक, यांच्या सह बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी,  पत्रकार आजम खान, शेख गुफरान, नदिम खान व विद्यार्थी तसेच द ग्रेट मराठा मंडळाचे नरेश रत्नपारखी, कृष्णा भातखडे, कृष्णा पिंजरकार, ओम धाईत यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे