बहुजनांचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.....

बहुजनांचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- दि. 2 नोव्हेंबर 2025: बहुजन नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी पुन्हा एकदा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही तक्रार  शुद्धधन इंगळे रा. कन्हेरी (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, काही फेसबुक पेजेस आणि व्यक्तींनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध अवमानकारक, बदनामीकारक आणि समाजात तणाव निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित केले. हे व्हिडिओ 29 ऑक्टोबर 2025 रोजी सोशल मीडियावर प्रसारित झाले असून, समाजात असंतोष पसरविण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 299, 196, 357 तसेच इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 च्या कलम 3(1)(r)(s) अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष गोरसिंग राठोड , अजगर पठाण, शेख नईमोद्दीन, गोबा शेठ , दिनेश मानकर , अमोल जामनिक , राजदीप वानखडे, इम्रान खान, श्रावण भातखड,सुनील जाधव,  रक्षक जाधव,अमित तायडे, रत्नपाल डोंगरे, शुभम इंगळे, सुनील जाधव , शैलेश सिरसाठ, अमित तायडे , सय्यद नदीम, सय्यद बहार , राजकुमार खाडे, यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे