बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात कॉग्रेसचे राजीनामा सत्र सुरू....
बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात कॉग्रेसचे राजीनामा सत्र सुरू....
बार्शिटाकळी : होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती व बार्शिटाकळी नगर पंचायत निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधीकाऱ्यांना निवडणुकीत संधि देत नसल्याने व पक्षात महत्वाच्या पदाधीकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे बार्शिटाकळी तालुका अध्यक्ष श्री रमेश अनंतराव बेटकर यांच्या सह ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदाचा शेख अजहर शेख जमीर तसेच जिल्हा कॉग्रेसचे कमिटिचे सचिव उदय विठ्ठलराव साल्पीकर व बार्शिटाकळी तालुका उपाध्यक्ष भास्कर दामोदर काळे तसेच सदस्य गजानन अवधूत नानोटे, संजय काशीराम काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज दिनांक १४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व जिल्हा कॉग्रेसचे कमिटिचे जिल्हा अध्यक्ष श्री अशोक अमानकर यांना दिला
Comments
Post a Comment