बार्शिटाकळीत बिरसा मुंडा जयंती साजरी.....
बार्शिटाकळीत बिरसा मुंडा जयंती साजरी.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : येथील गोवारी पुरा येथे बिरसा मुंडा उत्सव समिती बार्शिटाकळीच्या वतीने बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश कुरसेंगे आदिवासी जनसेवक तथा आदिवासी संस्कृती संशोधक हे होते. कार्यक्रमाचे आयोजन शंकरराव मरसकोल्हे शहराध्यक्ष बार्शिटाकळी यांनी केले, रतन टेकाम, बंडू मसराम, चंदू मरसकोल्हे, प्रकाश मरसकोल्हे, नितीन टेकाम, राजू टेकाम, रितेश कुरसेंगे, इंदुबाई मरसकोल्हे, महिला अध्यक्षा अल्का मसराम, सविता मसराम, तालुका संघटक श्रीकृष्ण टेकाम, ज्योती मरसकोल्हे, रुख्माबाई मरसकोल्हे, निर्मलाबाई टेकाम, राजनंदनी टेकाम, रमाबाई नेवारे, पुष्पाबाई सहारे, रत्नाबाई कोहरे असे अनेक जण उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले मत व्यक्त केले.
Comments
Post a Comment