नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उसळली गर्दी! > बार्शिटाकळी नगर पंचायत निवडणूक -नगराध्यक्षासाठी १२ तर नगरसेवकांसाठी १३८ अर्ज
नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उसळली गर्दी!
> बार्शिटाकळी नगर पंचायत निवडणूक -नगराध्यक्षासाठी १२ तर नगरसेवकांसाठी १३८ अर्ज
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी: बार्शिटाकळी नगरपंचायत निवडणूक २०२५ साठी १७नोव्हेंबर हा नामांकन अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. अंतिम दिवस असल्याने नगर पंचायत कार्यालयात सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. अनेक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात हजेरी लावली. शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी ३३ उमेदवारांचे एकूण ३६ अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवारांचे ७ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत सदस्य पदासाठी १२९ उमेदवारांचे १३८ अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी १० उमेदवारांचे १२ अर्ज प्राप्त झाले. अंतिम दिवशी झालेल्या प्रचंड नामांकनामुळे यंदाची बार्शिटाकळी नगर पंचायत निवडणूक अतिशय चुरशीची आणि रोचक होणार, हे स्पष्ट झाले आहे. वाढलेली राजकीय हलचल आणि उमेदवारांचा उत्साह यामुळे शहरातील निवडणूक वातावरण पूर्णपणे तापले आहे.
असे आहेत नगराध्यक्ष पदांचे उमेदवार
कोकिळा श्रीराम येळवणकर (भाजप), नासेहा परवीन, अख्तर खातून अलिमोद्दीन (वंचित बहुजन आघाडी), रुपाली अंदागोदे (शिवसेना शिंदे गट), दीपमाला संजय मुळे (शिवसेना उबाठा गट), समीना अंजुम बिस्मिल्ला खान (काँग्रेस), सायमा परवीन अब्दुल शमी (एमआयएम), शाहीन परवीन शेख अजहर (अपक्ष), रेहाना बी आलमगीर, रुपाली अतुल गोल्डे (शिवसेना शिंदे गट)
Comments
Post a Comment