Posts

राजनखेड येथे कायदेविषयक शिबिर संपन्न....... महिला दिनानिमित्त उपक्रम.....

Image
राजनखेड येथे कायदेविषयक शिबिर संपन्न...... महिला दिनानिमित्त उपक्रम..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :  तालुक्यातील ग्रामपंचायत राजनखेड येथे उच्च न्यायालय मुंबई, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यांचे निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती बार्शिटाकळी तथा वकील संघ बार्शिटाकळी व ग्रामपंचायत राजनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिर हे सरपंच ईश्वरसिंग जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले असून त्याकरिता प्रमुख उपस्थिती मध्ये पी. एस. भंडारी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बार्शीटाकळी तथा अध्यक्ष, तालुका विधिसेवा समिती ए. एन. खताडे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर बार्शिटाकळी, सौ अनिता तेलंग उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद अकोला रविकांत पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती बार्शिटाकळी, एस.एस. गडलिंग अध्यक्ष तथा विधीज्ञ संघ बार्शिटाकळी, यांची होती. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व मान्यवरांचे वृक्ष व ग्रामगीता देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर स...