नातिकोद्दिन खतीब ह्यांच्या उमेदवारी वर नियमबाह्य आक्षेप घेण्याची प्रक्रिया वंचित बहुजन आघाडीने यशस्वी होऊ दिली नाही.
नातिकोद्दिन खतीब ह्यांच्या उमेदवारी वर नियमबाह्य आक्षेप घेण्याची प्रक्रिया वंचित बहुजन आघाडीने यशस्वी होऊ दिली नाही. बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : आज दि ३०/१०/२४ रोजी २९ बाळापूर - विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छानणी प्रक्रिया पार पडली.त्यावेळी विरोधकांनी ज्यांचा निवडणुक प्रक्रिये सोबत काही संबंध नाही अश्या व्यक्तीला आक्षेप दाखल करण्यासाठी पाठविले होते.नातिकोद्दिन खतीब ह्यांच्या उमेदवारी वर आक्षेप घेण्यासाठी त्यांनी अर्ज सादर केला.निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ह्यांनी देखील त्याचा अर्ज स्वीकारून एड संतोष रहाटे ह्यांनी एक प्रत त्यांना मिळाली म्हणून सही करून द्यावी असे सांगितले.त्यावर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव मा. राजेंद्र पातोडे ह्यांनी निवडणुक निर्णय अधिकारी ह्यांचे कडून निवडणुक प्रक्रिये सोबत काहीही संबंध नसलेल्या व्यक्ती कडून आक्षेप स्वीकारला जाण्याची कृती आणि अर्ज स्वीकारून त्यावर आमचे वकिला कडून रिसिव्ह म्हणून स्वाक्षरी मागण्याचे कृती वर आक्षेप घेतला.त्यावर एड. संतोष रहाटे ह्यांनी लोकप्रति...