बार्शिटाकळी नगरपंचायत वर ‘वंचित’चा झेंडा; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारला....

बार्शिटाकळी नगरपंचायत वर ‘वंचित’चा झेंडा; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारला 
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी नगरपंचायतेवर वंचित बहुजन आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा अख्तर खातून अलीमुद्दीन यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार स्वीकारला. 
या पदग्रहण सोहळ्यानिमित्त बार्शिटाकळी शहरात वंचित बहुजन आघाडीने मोठे शक्तिप्रदर्शन केले.
बार्शिटाकळी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी अख्तर खातून अलीमुद्दीन यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आज झालेल्या पदग्रहण सोहळ्यासाठी सुजात आंबेडकर यांनी विशेष उपस्थिती लावली.
यावेळी नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नगरपंचायतच्या माध्यमातून शहराचा विकास आणि वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या सोहळ्याला वंचित बहुजन युवा आघाडीचे
राजेंद्र पातोडे (प्रदेश महासचिव, वंचित बहुजन युवा आघाडी), प्रमोद देंडवे (अकोला जिल्हाध्यक्ष), श्रीकांत घोगरे (युवा जिल्हाध्यक्ष) यांच्यासह पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष गोरशिग राठोड, शहर अध्यक्ष अजहर पठाण, यांच्या सह आजी माजी पदाधिकारी आणि बार्शिटाकळी शहरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्षा अख्तर खातून यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या मूलभूत समस्या सोडवण्याला आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. सुजात आंबेडकर यांच्या दौऱ्यामुळे अकोला जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मोठी आघाडी घेईल असे चित्र आहे.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....