Posts

Showing posts from May, 2026

पिंपळशेंडा एमआयडीसीसाठी राखीव २५ एकर जमीन स्थानिक बेरोजगार युवकांना देण्याची मागणी; प्रशासनाची दखल...

Image
पिंपळशेंडा एमआयडीसीसाठी राखीव २५ एकर जमीन स्थानिक बेरोजगार युवकांना देण्याची मागणी; प्रशासनाची दखल बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : तालुक्यातील पिंपळशेंडा येथे एमआयडीसीसाठी राखीव असलेली २५ एकर जमीन स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार व स्वरोजगार निर्मितीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल जामनिक यांनी शासन व प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, मूर्तिजापूर यांनी संबंधित प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी अकोला यांच्याकडे पाठविले आहे. अमोल जामनिक यांनी या विषयासाठी केवळ स्थानिक स्तरावरच नव्हे तर मंत्रालय स्तरावरही निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय अधिकारी तसेच संबंधित विविध शासकीय विभागांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून बार्शिटाकळी तालुक्याच्या औद्योगिक विकासाचा मुद्दा उपस्थित केला होता. दि. ०५ मार्च २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, पिंप...

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

Image
एकाच दोरीला दोघांची आत्महत्या..... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी :-  पोलीस ठाणे हद्दीत एकाच दोरीला दोन व्यक्तींनी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. मृतकांमध्ये कीशोर बळीराम सोनटक्के (वय ४०, रा. कानडी ता. मुर्तिजापूर जि. अकोला) व कीशोर मारोती बोडखे (वय ६०, रा. वरुड ता. मंगरुळपीर जि. वाशिम) यांचा समावेश आहे. दोन्ही मृतक ९ मे २०२६ पासून घरातून बेपत्ता होते. त्यानंतर मृतक क्र. १ संदर्भात पिंजर पोलीस ठाण्यात तर मृतक क्र. २ संदर्भात मंगरुळपीर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, १० मे रोजी मृतक कीशोर सोनटक्के यांचा भाचा रोहन दत्तात्रय महल्ले (रा. शेलू खुर्द, ता. बार्शीटाकळी) याला त्याच्या मामाने WhatsApp वर एक चिठ्ठी पाठविल्याची माहिती समोर आली. त्या संदेशामध्ये दोघांनी महान धरणाजवळील बिहाड माथा शेतशिवारातील जंगल परिसरात निंबाच्या झाडाला एकाच दोरीच्या स...

राहुल भातखंडे यांच्या ‘बियॉन्ड द क्रेस्केंडो’ कादंबरीचा जागतिक प्रकाशन १४ सप्टेंबर २०२६ रोजी....

Image
राहुल भातखंडे यांच्या ‘बियॉन्ड द क्रेस्केंडो’ कादंबरीचा जागतिक प्रकाशन १४ सप्टेंबर २०२६ रोजी.... बार्शिटाकळी :- राहुल भातखंडे यांच्या ‘बियॉन्ड द क्रेस्केंडो’ कादंबरीचा जागतिक प्रकाशन दिनांक जाहीर…उदयोन्मुख भारतीय लेखक राहुल भातखंडे (Rahul Bhatkhande) यांनी आपल्या पहिल्या साहित्यिक कादंबरी (Novel) ‘बियॉन्ड द क्रेस्केंडो’च्या (Beyond The Crescendo) जागतिक प्रकाशनाची अधिकृत घोषणा केली आहे. हा बहुप्रतीक्षित कादंबरी १४ सप्टेंबर २०२६ रोजी, श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर जगभरात प्रकाशित होणार आहे. या घोषणेनंतर साहित्यप्रेमी आणि वाचकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले राहुल भातखंडे यांनी अनेक वर्षांच्या लेखनप्रवासानंतर हा महत्त्वाकांक्षी कादंबरी साकारला आहे. या घोषणेच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर, एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या वाचकांचे आणि समर्थकांचे आभार मानले आहेत. Beyond The Crescendo | भावनांचा आणि संघर्षांचा सखोल प्रवास ‘बियॉन्ड द क्रेस्केंडो’ (Beyond Th...