Posts

Showing posts from July, 2026

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी महाराष्ट्र बंदला बार्शीटाकळीत उत्स्फूर्त प्रतिसाद......

Image
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी महाराष्ट्र बंदला बार्शीटाकळीत उत्स्फूर्त प्रतिसाद.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी, दि. 23 जुलै : दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष  ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 23 जुलै महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला बार्शिटाकळी शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  व्यापारी, नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत बंद यशस्वी केला. या बंदद्वारे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि चौकशीनंतर कायद्यानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही आणि संविधानिक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरूच राहील, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तालुक्यातील तालुका कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तसेच आजी-माजी सर्व ...

बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयात मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ३७५ रुग्णांची तपासणी...

Image
बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयात मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ३७५ रुग्णांची तपासणी...... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  ग्रामीण रुग्णालय, बार्शिटाकळी येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला, विघ्नहर्ता रुग्णालय, अकोला तसेच संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. दि. २० जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या या शिबिरात एकूण ३७५ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर), थायरॉईड, कर्करोग (कॅन्सर), कान-नाक-घसा (ईएनटी), अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) तसेच बालरोग आदी विविध आजारांची तपासणी करण्यात आली. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजना साठी ग्रामीण रुग्णालयाच्या वैदकीय अधीक्षक डॉ.वृषाली खोंडे यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये शालिनी खाडे, उमा माने, चित्रा सोनवणे, मोनाली गव...

१२ तासांत अनिकेत इंगळे खून प्रकरणाचा छडा…६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात…. 👉हत्येच कारणही आलं समोर?

Image
१२ तासांत अनिकेत इंगळे खून प्रकरणाचा छडा…६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात…हत्येच कारणही आलं समोर? बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :  बार्शिटाकळी तालुक्यातील निंबी गावात घडलेल्या अनिकेत इंगळे खून प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बार्शिटाकळी पोलिसांनी संयुक्त कारवाईत सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. शेतीच्या वादातून डोळ्यांत मिरची पावडर मिसळलेले पाणी टाकून हतोड्याने डोक्यावर वार करत अनिकेतची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप असून, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि रात्रभर राबविलेल्या शोधमोहीमेच्या आधारे आरोपींना जेरबंद केले. दिनांक ३० जून २०२६ रोजी पोलीस स्टेशन बार्शिटाकळी हद्दीतील मौजे निंबी येथे फिर्यादी सौ. प्रार्थना भास्कर इंगळे यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करून त्यांचा मुलगा अनिकेत भास्कर इंगळे (वय २७) याच्यासोबत शेतीच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर त्याच्या डोळ्यांत मिरची पावडर मिसळलेले पाणी टाकून हतोड्याने डोक्यावर वार करत त्याची हत्या केली. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बा...