Posts

Showing posts from March, 2026

कीर्तन सोहळ्याचे आयोजन.... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे

Image
कीर्तन सोहळ्याचे आयोजन....  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :-  तालुक्यामधील ग्राम महान येथील नवसाला पावणारे व जागृत देवस्थान श्री जागृत महादेव मंदिर वाई महान येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार , आवाजाचे जादूगार ह भ प श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या जाहीर कीर्तनाचा सोहळ्याचे आयोजन दिनांक 03 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले असून सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सदर सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जागृत महादेव मंदिर, वाई महान यांचे वतीने करण्यात आले आहे.

जमिअत उलेमा-ए-हिंद महान युनिटने आयोजित केलेले एसआयआर मॅपिंग शिबिर यशस्वीरित्या पार......

Image
जमिअत उलेमा-ए-हिंद महान युनिटने आयोजित केलेले एसआयआर मॅपिंग शिबिर यशस्वीरित्या पार....... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी :-  बार्शिटाकळी तालुका जमियत-ए-उलामा ग्राम महान युनिट तर्फे शनिवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी जिल्हा सदस्य अलहाज मास्टर शब्बीर खान यांच्या नेतृत्वाखाली डॉ.मोहम्मद अश्रफ यांच्या संकुलात एक दिवसीय SIR मॅपिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ अनेकांनी घेतला व मॅपिंग, नाव दुरुस्ती आदी सर्व कामे करण्यात आली ज्यामध्ये महान सर्कलचे सर्व बीएलओ देखील सहभागी झाले होते.  हे शिबीर यशस्वी करण्यासाठी बार्शिटाकळी तालुका जमीयत-ए-उलामा महान युनिटचे पदा अधिकारी हाफिज इनायत खान साहब, मुफ्ती मोहम्मद वसीम साहब, डॉ.मोहम्मद अशरफ, तंटा मुक्ती महान अध्यक्ष शेख रशीद, हाफिज जावेद खान, अब्दुल हक उर्फ जावेद, शेख सादिक, शेख साजिद, हरमन खान, सोहेल खान यांनी परिश्रम घेतले.यावेळी मोहम्मद आबिद, वसीम जहागीरदार सर, शेख महेमूद, नदीम जहागीरदार, एजाज खान, आदी उपस्थित होते.

किसान ब्रिगेडच्या तालुका प्रमुखपदी गोविंदा ढोके यांची निवड : सर्वत्र कौतुक

Image
किसान ब्रिगेडच्या तालुका प्रमुखपदी गोविंदा ढोके यांची निवड : सर्वत्र कौतुक बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी :-  बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर येथील रहिवासी युवा कार्यकर्ते गोविंद ढोके यांची नुकतीच किसान ब्रिगेडच्या तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे, प्रसंगी गोविंदा ढोके यांना दैनिक देशोन्नतीचे वरिष्ठ संपादक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदादा पोहरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे, गोविंद ढोके यांची बार्शिटाकळी तालुका प्रमुख पदी निवड झाल्याने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे, यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान पाटील, जिल्हा सचिव नंदकिशोर निलखन, विभागीय अध्यक्ष दिवाकर पाटील, अकोला महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर अप्रूजा देशमुख यांचे सह अनेक मान्यवर मंडळीचीं यावेळी उपस्थित होती, सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी किसान ब्रिगेडचे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख गोविंदा ढोके यांचे अभिनंदन करून सर्वांनी शुभेच्छा दिल्यात, तसेच बार्शिटाकळी तालुक्यातील अनेकांनी गोविंद ढोके यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

विद्यार्थ्यांनी परमनंट मेमरी कडे वळावे - प्रकाश पोहरे

Image
विद्यार्थ्यांनी परमनंट मेमरी कडे वळावे - प्रकाश पोहरे  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शिटाकळी येथे देशोन्नती वृत्तपत्राचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे व डॉ मधुकर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदवीदान समारंभ संपन्न झाला यावेळी मंचकावर श्री प्रकाश पोहरे डॉ मधुकरराव पवार प्राचार्य डॉ बिस्मिल्ला खान उपप्राचार्य डॉ संतोष हुसे डॉ अमित वैराळे दादाराव भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते   कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यावेळी डॉ दीपक चौरपगार यांनी विद्यापीठ गीताचे आयोजन केले श्री प्रकाश पोहरे यांनी आपल्या भाषणात बोलत असताना विद्यार्थ्यांनी परमनंट मेमरी  कडे वळावे कारण आज चा युवक हा सोशल मीडियामध्ये गुंतलेला आहे तो स्वतःच फसत आहे देशात अनेक समस्या आहेत त्यामध्ये एक नवीन समस्या उद्भवत आहे जसे नोकरी नाही तर छोकरी नाही अनेक युवक अविवाहित राहतील युवकांनी काय करावे अशा विविध समस्यांना उजाळा देत त्यांनी म...

शेतकऱ्याचा संयम सुटला; मोजणी शीटसाठी महिनाभर पायपीट ! 👉१ एप्रिलपासून 'आमरण उपोषणाचा' इशारा.....

Image
शेतकऱ्याचा संयम सुटला; मोजणी शीटसाठी महिनाभर पायपीट ! 👉१ एप्रिलपासून 'आमरण उपोषणाचा' इशारा..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळीः प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी सामान्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याऐवजी त्यांना कशी अरेरावी करतात, याचा संतापजनक प्रकार बार्शिटाकाळी तहसील कार्यालयात समोर आला आहे. आपल्या हक्काच्या शेतीची मोजणी होऊन महिना उलटला, तरी 'मोजणी शीट' मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या विझोरा येथील उमेश रमेश गवई या तरुण शेतकऱ्याने आता थेट प्रशासनाशी आरपारची लढाई पुकारली आहे. १ एप्रिल २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा गवई यांनी पत्राद्वारे दिला आहे. उमेश गवई यांची मौजे विझोरा येथे गट नं. ४० मध्ये शेती आहे. या शेतीच्या मोजणीसाठी त्यांनी रीतसर अर्ज केला होता. मोजणीसाठी त्यांना २४/०९/२०२५, १५/१०/२०२५ आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख ०४/०२/२०२६ अशा तब्बल तीन तारखा देण्यात आल्या. अखेर अनेक फेऱ्या मारल्यानंतर २४ फेब्रुवारी २०२६ रोजी विचनकर यांच्यामार्फत मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. नियमानुसार ४ दिवसांत मोजणी शीट मिळणे अपेक्षि...

गुलाम नबी आझाद महाविद्यालयात डॉ दीपक चौरपगार यांचा सत्कार.......

Image
गुलाम नबी आझाद महाविद्यालयात डॉ दीपक चौरपगार यांचा सत्कार....... बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी :- प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ बिस्मिल्ला खान यांच्या मार्गदर्शनात या पीएचडी रिसर्च स्टडी सेंटर द्वारा आयोजित सत्कार समारंभामध्ये प्रा डॉ दीपक चौरपगार यांच्या सह इतरही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ नव्यानेच जाहीर झालेल्या पीएचडी आचार्य पदवीचे मार्गदर्शक यादी नुसार डॉ. संतोष हुशे, डॉ. मोहन बल्लाल, डॉ प्रवीणकुमार राठोड डॉ दीपक चौरपगार डॉ आर एल सरकटे डॉ दीपिका जैन, डॉ प्रियंका मसतकर, डॉ नीलिमा कंकाळे, डॉ संजय देशमुख, डॉ. मनोज जाधव, डॉ भीमराव जैवळ यांचेही आचार्य मार्गदर्शक म्हणून स्वागत करण्यात आले पीएचडी रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ प्रवीण देशमुख यांनी प्रास्ताविक आणि संचालन करीत असताना संशोधक आणि मार्गदर्शक यांना करावयाची कामे तसेच यूजीसी...

बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी......👉ऐतिहासिक ईदगाहवर सामाजिक सलोख्याचे दर्शन बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे

Image
बार्शिटाकळी शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी...... 👉ऐतिहासिक ईदगाहवर सामाजिक सलोख्याचे दर्शन बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी   एक महिनाभर चाललेल्या उपासना आणि उपवासाच्या कालावधीनंतर, शनिवार, २१ मार्च रोजी—देशाच्या इतर भागांप्रमाणेच—बार्शिटाकळी शहरातही 'ईद-उल-फित्र' हा सण अत्यंत उत्साह, श्रद्धा आणि बंधुभावाने साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच, उपासकांची प्रचंड गर्दी मशिदी आणि ईदगाहकडे लोटली होती आणि संपूर्ण शहर "अल्लाहु अकबर" च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. शहराच्या मध्यवर्ती ईदगाहवर, सकाळी ९:१५ वाजता मौलाना अझीझ उल्ला खान यांनी हजारो लोकांच्या सामूहिक नमाजाचे नेतृत्व केले; नमाजानंतर, संपूर्ण देशात शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव नांदावा यासाठी विशेष प्रार्थना (दुवा) करण्यात आली. दरम्यान, शहराच्या विविध भागांतही नमाजाचे नेतृत्व करण्यात आले: अकोली बेस येथील मिनारा मशिदीमध्ये सकाळी ८:३० वाजता मौलाना अब्दुल सलाम मझहरी यांनी; खडकपुरा येथील मशिद अक्सा येथे सकाळी ८:४५ वाजता मौलाना एजाज यांनी मशिद इमली बन येथे सकाळी ९:०० वाजता हाफिज ...

बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक व इफ्तार पार्टीचे आयोजन.....शहराची शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण धुमाळ यांचे आवाहन.....बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे

Image
बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक व इफ्तार पार्टीचे आयोजन..... शहराची शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण धुमाळ यांचे आवाहन..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- आज बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रविण धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या गुढिपाडवा, रमजान ईद, व रामनवमी सणाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत पोलीस निरीक्षक श्री प्रविण धुमाळ यांनी सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ, फोटो बनवून त्या फोटोची व व्हिडिओ ची शहानिशा न करता वाष्टअप ग्रुप वर शेअर करण्यात येतात असे फेक व्हिडिओ किंवा फोटो मुळे समाजा समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य कोणी करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन बार्शिटाकळी शहराची शांतता होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन केले. तसेच रमजान महिन्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे सुद्धा आयोजन करण्यात आले.. यावेळी या सभेला प्रमुख उपस्थिती पोलीस उपनिरीक्षक श्री चाठे साहेब, नव्याने र...

बार्शिटाकळी पाणी पुरवठा योजनेतील कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे नगरसेवक सै. जहांगीर यांची मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री यांच्या कडे मागणी......

Image
बार्शिटाकळी पाणी पुरवठा योजनेतील कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे नगरसेवक सै. जहांगीर यांची मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री यांच्या कडे मागणी... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे   बार्शिटाकळी :- बार्शिटाकळी शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात मोठा विलंब झाल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नपं चे नगर सेवक सै. जहांगीर यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांच्या कडे एका निवेदन द्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत बार्शीटाकळी शहरासाठी पाणी पुरवठा योजना प्रकल्पास २४ मार्च २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार बार्शीटाकळी नगरपंचायत मार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण करून अकोला येथील कंत्राटदार श्याम भगवंतराव माहोरे यांना ६ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात आला होता. करारानुसार हे काम १८ महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र प्रत्यक्ष पाहणीमध्ये कंत्राटदाराने विहित मुदतीत काम पूर्ण केले ...

कृत्रिम बुद्धिमत्ता भावी शिक्षक ठरू शकत नाही - डॉ गोवर्धन बंजारा...

Image
कृत्रिम बुद्धिमत्ता भावी शिक्षक ठरू शकत नाही - डॉ गोवर्धन बंजारा...  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- स्थानिक गुलाब नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी तथा मधुकरराव पवार कला महाविद्यालय, मुर्तिजापूर जिल्हा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रिसेन्ट ट्रेंड्स वर दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद डॉ मधुकरराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली   उद्घाटन पर भाषणामध्ये डॉ गोवर्धन बंजारा यांनी अतिशय शास्त्र पद्धतीने मार्गदर्शन करत आज AI चा जमाना आहे या संशोधकांना घडवणारा शिक्षक आहे पण आजची कृत्रिम बुद्धिमत्ता ही उद्याचा भावी शिक्षक ठरूच शकत नाही असे उद्गार काढले या परिषदेला भारताच्या बाहेरील तथा भारताच्या विविध राज्यातुन अनेक संशोधक विद्यार्थी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक व इतरांनी यामध्ये सहाशे च्या जवळपास नोंदनी करून, तिनशे च्या वर शोधनिबंधाची नोंद करण्यात आली.सकाळी अकरा वाजता उदघाटन सोहळा पार पडला. यामध्ये अनेक मान्यवरांचा सामावेश होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ मधुकरराव पवार म्हणून, तर उद...

भारत-अमेरिका व्यापारी कराराची होळी; बहिरखेडमध्ये शेतकरी यल्गार समितीचे आंदोलन...तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे....

Image
भारत-अमेरिका व्यापारी कराराची होळी; बहिरखेडमध्ये शेतकरी यल्गार समितीचे आंदोलन... तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे.... बार्शिटाकळी : शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारा आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा भारत-अमेरिका व्यापारी करार रद्द करावा, या मागणीसाठी आज होळीच्या मुहूर्तावर शेतकरी यल्गार समितीने आक्रमक पवित्रा घेतला. बार्शिटाकळी तालुक्यातील बहिरखेड येथे या जाचक कराराच्या प्रतींची होळी करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. भारत अमेरिका व्यापारी करार हा भारतीय शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे. या करारामुळे शेती व्यवसाय उद्ध्वस्त होईल आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी पसरेल, अशी भीती यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. होळीच्या दिवशी सण साजरा करण्याऐवजी आपल्या न्याय्य हक्कांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे चित्र बहिरखेडमध्ये पाहायला मिळाले. यावेळी केंद्र सरकारने प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापारी करार त्वरित रद्द करावा, आयात-निर्यात धोरणात बदल करून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, शेतीमालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांचे शोषण थांबवावे अशा मागण्या करण्यात आल्या. या ...

राजनखेड येथे रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न.....बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे

Image
राजनखेड येथे रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- स्थानीक बार्शिटाकळी येथील प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शिटाकळी जि. अकोला, राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत सत्र २०२५-२६ चे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप राजनखेड येथे संपन्न झाला. सदर रासेयो चे निवासी श्रमसंस्कार शिबीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बि एस खान, गावचे सरपंच ईश्वरसिंग जाधव, उपसरपंच शुभम घुगे व जि प शाळेचे मुख्याध्यापक राजेश पातोडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. शेवटच्या दिवशी महाविद्यालयाचे ऊपप्राचार्य डॉ अमीत वैराळे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सत्राची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन, दीपप्रज्वलन व विद्यापीठ गीताने करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत झाडांचे रोपटे देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा से यो चे कार्यक्रम धिकारी डॉ. व्हि.एस.उंडाळ यांनी केले. सात दिवसीय निव...

आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संगीता जाधव यांची उद्या आकाशवाणीवर मुलाखत.....

Image
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संगीता जाधव यांची उद्या आकाशवाणीवर मुलाखत... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वास्थ अभंगता व महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष संगीता जाधव यांची मुलाखत 3 मार्च रोजी सकाळी दहा वाजता F. M. M. १०२. Mhz या आकाशवाणी चैनल वर मुलाखात प्रसारित होणार आहे. संगीता जाधव यांची महिला विश्व अंतर्गत कार्यक्रमाचे सरळ प्रसारण  आरोग्य विभागात काम करत असताना प्रतिबंधात्मक व उपचारात्मक तळागाळाला गाव पातळीला जीव वाचवणे च्या हेतूने मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवीत अहोरात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता व अगदी जीव मुठीत घेत रुग्णांची सेवा करतात प्रतिबंधात्मक उपाययोजना गाव पातळीवर राबवून आधीच आजाराला व संभाव्य होणाऱ्या अघटीत घटनेला आळा घालण्याचं मुख्य कार्य म्हणजे महिला आरोग्य कर्मचारी आरोग्य सेविका स्वास्थ्य अभ्यंगता किंवा महिला विश्व म्हणून महिलांची कशा पद्धतीने तारावरची कसरत करून आपले कर्तव्य जबाबदारी महिला वर्ग पार पाडत असतात ह्याच संदर्भात जया सहस्त्र...

प्रवीण बोपुलकर यांच्या ‘वाळन’ कथेचा संत गाडेगाबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश......

Image
प्रवीण बोपुलकर यांच्या ‘वाळन’ कथेचा संत गाडेगाबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश... बार्शिटाकळी  प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : पातुर तालुक्यातील खेट्ट्री येथील श्री. प्रवीण जगन्नाथ बोपुलकर यांच्या साहित्यिक कार्याला मानाचा सन्मान मिळाला असून त्यांच्या गाजलेल्या ‘वाळन’ कथेचा या बी. ए. भाग-२(सत्र ४) साठी नेमलेल्या मराठी साहित्य या विषयाच्या अभ्यासक्रमासाठी राघव पब्लिकेशन द्वारा प्रकाशित 'वैदर्भीय कथा' या डॉ. गणेश मालटे, डॉ. गजानन मुंदे, डॉ. राजेश मिरगे संपादित या पुस्तकाचा संत गाडेगाबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून या ग्रंथास सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. माधव पुटवाड यांची प्रस्तावना लाभली आहे.   ग्रामीण जीवनाचे वास्तव, मानवी नातेसंबंधातील सूक्ष्म भावविश्व, सामाजिक जाणिवा आणि जीवनातील विविध वळणांचे संवेदनशील चित्रण करणाऱ्या ‘वाळन’ कथासंग्रहाने वाचक व समीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते. प्रवीण बोपुलकर हे प्रशासकीय सेवेसोबत सातत्याने साहित्य साधना करणारे साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साहित्यसंपदे...