मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रता / अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याबाबत अंगणवाडी सेविकांना सुचना........
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रता / अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याबाबत अंगणवाडी सेविकांना सुचना.........
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग पत्र क्रमांक मबाबि २०२५ । प्रक्क २३९ का ०२ दिनांक २०.१.२०२६
सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून e-KYC प्रक्रिया दि. ३१.१२.२०२५ पर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे. सदर प्रक्रिया पार पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या बाबी शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्यानुषंगाने योजनेच्या निकषानुसार सदर लाभार्थी पात्र/अपात्र आहेत याची फेर पडताळणी होणे गरजेचे आहे. सदर योजनेंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्याच्या नोकरी/सेवानिवृती संदर्भातील निकष खालील प्रमाणे आहेतः-
१) लाभाथ्यांचे वय वर्ष २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त नसावे.
२) लाभार्थी केवळ पात्र महिला (Female) असावी.
३) लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नसावा.
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपरोक्त प्रमाणे योजनेच्या निकषानुसार e-KYC केलेल्या लाभार्थी महिला पैकी शासनाकडून प्राप्त झालेल्या यादी मधील लाभार्थीची अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रियस्तरावर प्रत्यक्षरित्या खातरजमा करुन व सखोल तपासणी करण्यात येणार आहे. तरी आपले क्षेत्रातील अंगणवाडीत दिनाक २६ जानेवारी २०२६ सोमवार नंतर संपर्क साधवा
Comments
Post a Comment