मंदिरातील पूजेचे साहित्य चोरणाऱ्या अटक.... 👉६०५० रुपयांचे चोरी केलेले साहित्य आरोपीकडे आढळले!‌

मंदिरातील पूजेचे साहित्य चोरणाऱ्या अटक
👉६०५० रुपयांचे चोरी केलेले साहित्य आरोपीकडे आढळले!
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- बार्शिटाकळी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका मंदिरात पूजेचे साहित्य चोरून नेणाऱ्या आरोपीस काही नागरिकांच्या सतर्कतेने पोलिसांनी पकडून अटक केल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली.
फिर्यादी शिक्षण व गृहरक्षक विभागातील सेवानिवृत्त अधिकारी नरेंद्र पोटेकर यांनी बार्शिटाकळी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या लेखी जबाबानुसार काळा मारुती चौकातील गोपालकृष्ण मंदिरातून एक अनोळखी इसम पूजेचे साहित्य पिशवीत चोरून नेताना गोपाल जाधव यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला पकडले व बार्शिटाकळी पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीची झडती घेतली असता महादेवाच्या मंदिरातील नंदादीप व गोपाळकृष्ण मंदिरातील तांबे पितळीचे पूजेचे साहित्य, घंटा आदी ६०५० रुपयांचे चोरीचे साहित्य आढळून पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याचे नाव राजू सीताराम पेनुरकर (रा. परळी, जि. बीड) येथील रहिवासी असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीकडील चोरीचे साहित्य हस्तगत केले असून, गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. ही कारवाई बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....