पिंपळशेंडा एमआयडीसीसाठी राखीव २५ एकर जमीन स्थानिक बेरोजगार युवकांना देण्याची मागणी; प्रशासनाची दखल...

पिंपळशेंडा एमआयडीसीसाठी राखीव २५ एकर जमीन स्थानिक बेरोजगार युवकांना देण्याची मागणी; प्रशासनाची दखल
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : तालुक्यातील पिंपळशेंडा येथे एमआयडीसीसाठी राखीव असलेली २५ एकर जमीन स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार व स्वरोजगार निर्मितीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल जामनिक यांनी शासन व प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, मूर्तिजापूर यांनी संबंधित प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी अकोला यांच्याकडे पाठविले आहे.
अमोल जामनिक यांनी या विषयासाठी केवळ स्थानिक स्तरावरच नव्हे तर मंत्रालय स्तरावरही निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय अधिकारी तसेच संबंधित विविध शासकीय विभागांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून बार्शिटाकळी तालुक्याच्या औद्योगिक विकासाचा मुद्दा उपस्थित केला होता.
दि. ०५ मार्च २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, पिंपळशेंडा येथील एमआयडीसीसाठी राखीव २५ एकर जमीन स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना लीजवर देण्याबाबत निवेदन प्राप्त झाले असून त्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे.
बार्शिटाकळी तालुक्यात आजही उद्योगधंद्यांचा अभाव असल्यामुळे अनेक युवक बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जात आहेत. उद्योगासाठी जमीन उपलब्ध झाल्यास लघुउद्योग, वेअरहाऊस, प्रक्रिया उद्योग, उत्पादन युनिट यांसारखे प्रकल्प उभे राहू शकतात आणि स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते अमोल जामनिक यांनी “तालुक्यातील बेरोजगार युवकांना न्याय मिळावा आणि बार्शिटाकळीचा औद्योगिक विकास व्हावा” या उद्देशाने सातत्याने लढा सुरू ठेवला असून, प्रशासनाने या मागणीची दखल घेतल्याने युवकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे