शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून कृषी सहाय्यक, तलाठ्याने ठेवले वंचित...👉 जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून कृषी सहाय्यक, तलाठ्याने ठेवले वंचित... 👉 जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : तालुक्यातील मिर्जापूर येथील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. सर्वेक्षण करणाऱ्या कृषी सहायक व तलाठ्याने शासकीय मदतीपासून वंचित ठेवले आहे, अशा प्रकारची तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. बार्शिटाकळी तालुक्यातील मिर्जापूरचे शेतकरी दिगंबर अवधूत जाधव यांनी १.८२ हेआर हरभरा पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते. सदर पिकाचे सर्वेक्षण कृषी सहाय्यक व तलाठी यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत माझे क्षेत्र अत्यंत कमी दाखवले होते. त्यामुळे मी त्यांच्यावर आक्षेप घेतला. यावेळी तलाठ्यांनी मला बियाण्याच्या पावत्यांची मागणी केली. यानंतर मी कोतवाल यांच्याजवळील व्हॉट्स अॅपवर सदर माहिती सादर केली. तरीसुद्धा त्यांनी माझे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावरही अत्यंत कमी क्षेत्र दाखविले आहे. त्यामुळे मला शासकीय मदतीपासून वंचित ठेवत तलाठी व कृषी सहाय्यक यांनी शासनाला खोटी व चुकीची माहिती साद...