Posts

Showing posts from February, 2025

आरोग्य सेवक शेषराव राठोड यांचा जल जीवन मिशन अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार

Image
आरोग्य सेवक शेषराव राठोड यांचा जल जीवन मिशन अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : तेल्हारा तालुक्यातील आरोग्य सेवक व आरोग्य सेविका ग्रा पं चे जलसुरक्षक बंधूंना वेळोवेळी सहकार्य करने ,,, पानी नमुने बाबतीत वारंवार वीचारना करून फोन ध्वनी द्वारे माहिती विचारपुस करणे,,, रासायनिक व जैविक पानी उपविभागीय प्रयोगशाळा तेल्हारा येथे १०० टक्के पाठविने या सर्व कार्यक्रम मध्ये सगळ्यांना वारंवार मदत करने,, या सर्व ऊत्कृष्ट कार्याबद्दल शेषराव श्रीराम राठोड आरोग्य सेवक उपकेंद्र वाडीअदमपुर पं स तेल्हारा यांचा सत्कार करण्यात आला.जल जीवन मिशन जिल्हा परिषद अकोला अंतर्गत एक दिवसीय पानी गुणवत्ता प्रशिक्षण , तेल्हारा येथील श्रीक्रूष्ण मंदीर येथे घेण्यात आले असता जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार, सौ. ममता गणोदे व उपविभागीय प्रयोगशाळा तेल्हारा सौ. तायडे मॅडम तेल्हारा तालुका आरोग्य अधिकारी विजय बडगे , गटविकास अधिकारी पं स तेल्हारा सुभाष काळे , आरोग्य विस्तार अधिकारी, काकडे प्रशांत डोडेवार, वाकोड, वैद्यकीय अधिकारी दानापूर, तेल्हारा त...

आरोग्य सहायिका मंजू घन यांचा संघटनेच्या वतीने सेवानिवृत्ती पर सत्कार..

Image
आरोग्य सहायिका मंजू घन यांचा संघटनेच्या वतीने सेवानिवृत्ती पर सत्कार.. बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरी सरप येथे कार्यरत श्रीमती मंजू घन ह्या वयो मर्याद्या नुसार आज दिनांक 28/ 2/25 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरीसरप येथे सेवानिवृत्त होत आहेत त्याकरिता महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला वतीने संगीता जाधव जिल्हाध्यक्ष ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन मंजू घन यांचा सत्कार केला सूत्रसंचालन संघटना कोषाध्यक्ष मंगला तितुर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिता चव्हाण संघटना जिल्हा संघटक यांनी पार पाडले सत्कार समारंभाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गमे ,नरेश ,  शुभम महापुरे, शितल तेलगोटे, प्रियंका मोरे, अंजली, राजकुमार महल्ले, श्रीकृष्ण शेळके, सुरेखा घुगे, अलका जाधव, चंदन उपराथ असे सर्व कर्मचारी हजर होते.  प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरी सरप येथे कर्करोग मोबाईल व्हॅन द्वारे तपासणी मोहीम, बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  ब...

राशन दुकानदार जाकीर हुसैन यांनी उपलब्ध करून दिली आधार कार्ड अपडेट करण्याची सोय

Image
राशन दुकानदार जाकीर हुसैन यांनी उपलब्ध करून दिली आधार कार्ड अपडेट करण्याची सोय  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : येथील राशन दुकान क्रमांक ९१ एम एम हुसैनचे चालक तथा रास्त भाव दुकानदार संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष जाकीर हुसैन यांनी आपल्या राशन कार्ड धारकांना राशन कार्ड शी आधार नंबर लिंक करण्यासाठी आधार कार्ड अपडेट नसल्याने अडचणी येत होत्या व वयोवृद्ध महिला व पुरुष व लहान मुलांना अशा राशन कार्ड धारकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तहसील (आधार कार्ड सेंटर )वर जाण्यासाठी त्रास होत होता म्हणून बार्शिटाकळी येथील रास्त भाव दुकान एम एम हुसैन चे चालक जाकीर हुसैन यांनी आपल्या राशन दुकानातच आधार कार्ड अपडेट करण्याची सोय उपलब्ध करून दिली त्याबद्दल जाकीर हुसैन यांचे राशन कार्ड धारकांनी आभार मानुन आनंद व्यक्त केला 

महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेची त्रेमासिक आढावा सभा संपन्न....

Image
महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेची त्रेमासिक आढावा सभा संपन्न. बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारीअकोला ची महत्त्वपूर्ण त्रेमासिक सभा दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी आरोग्य कर्मचारी पतसंस्था येथे पार पडली, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री विष्णू लाड यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा पार पडली, यावेळी संघटनेचे अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यावर चर्चा करण्यात आली.जिल्ह्यातील रखडलेली पदोन्नती, एस नाईन श्रेणी बद्दल बाबत,प्रत्येक उपकेंद्रावर डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्याबाबत, आरोग्य कर्मचाऱ्यांचे नाव बदली बाबत,आरोग्य कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक्स स्कूटर देण्यात यावी, आदी विषयावर चर्चा करण्यात आली, यावेळी सभासद नोंदणी , वार्षिक वर्गणी जमा करण्याचे ठरविण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य नर्सेस आरोग्य कर्मचारी संघटनेला संघटनेचे उपाध्यक्ष विष्णू लाड साहेब यांनी ५००१ रुपये आर्थिक निधी दिल्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळ...

शेतात रोडगे पार्टी करताय, तर सावधान! मधमाश्यांच्या हल्ल्यात महिलेचा बळी

Image
शेतात रोडगे पार्टी करताय, तर सावधान! मधमाश्यांच्या हल्ल्यात महिलेचा बळी  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : शेतामध्ये रोडगे पार्टी करण्याचे नियोजन करताय तर सावध होण्याची गरज आहे. शेतात किंवा एखाद्या निर्जनस्थळी धुरामुळे परिसरातील मधमाश्यांचे पोळे बाधित होऊन मधमाश्या आक्रमण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे एका शेतात आयोजित केलेल्या रोडगे पार्टीवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. रोडगे पार्टी जीवावर बेतल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली.  बार्शीटाकळी तालुक्यात काजळेश्वर नावाचे गाव आहे. या गावातील प्रकाश पांडुरंग पवार यांच्या शेतामध्ये आज रोडगे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या रोडगे पार्टीला अनेकांना निमंत्रित करण्यात आले. या पार्टीची सकाळपासूनच जय्यत तयारी सुरू होती. रोडगे पार्टीतील अन्न शिजवण्यासाठी परिसरात गौऱ्या जाळण्यात आल्या. त्याच्या निखाऱ्यावर रोडगे भाजण्याचे काम सुरू असताना त्यातून...

प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रमाणपत्र ग्रामसभेत वितरण......घरकुल धारकांमध्ये आनंदाचे वातावरण...

Image
प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रमाणपत्र ग्रामसभेत वितरण...... घरकुल धारकांमध्ये आनंदाचे वातावरण...  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :बार्शिटाकळी पंचायत समिती अंतर्गत टाकळी छबिले येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये संबंधित अधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल मंजुरीसाठी ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. मंजूर घरांच्या बांधकामासाठी घरबांधणीच्या टप्प्यानुसार 1 लाख 20 हजार रुपये अनुदान चार हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केले जाईल. याशिवाय रोहयो अंतर्गत 26,430 रुपये, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12 हजार रुपये असे एकूण 1 लाख 58 हजार 730 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. घराचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे, ज्याचे क्षेत्रफळ किमान 25 चौरस मीटर असावे. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कुटुंबातील महिला व पत्नी या दोघांच्या संयुक्त नावाने ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करणे आ...

विष्णू लाड यांनी दिला संघटनेला ५००१ रु चा निधी संघटनेच्या वतीने सत्कार...

Image
विष्णू लाड यांनी दिला संघटनेला ५००१ रु चा निधी संघटनेच्या वतीने सत्कार  बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनला संघटनेचे उपाध्यक्ष सेवानिवृत्त झालेले श्री विष्णू लाड यांनी संघटनेचे आर्थिक काम पाहता संघटने त्यांनी ५००१ रुपयाचा चेक दिला  त्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी अकोला ची महत्त्वपूर्ण त्रेमासिक सभा दिनांक 23/ 2/ 2025 रोजी आरोग्य कर्मचारी पतसंस्था येथे पार पडली, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री विष्णू लाड यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा पार पडली, यावेळी संघटनेचे अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यावर चर्चा करण्यात आली.जिल्ह्यातील रखडलेली पदोन्नती, एस नाईन श्रेणी बाबत,प्रत्येक उपकेंद्रावर डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्याबाबत , आरोग्य कर्मचाऱ्यांचे नाव बदली बाबत, आरोग्य कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक्स स्कूटर देण्यात यावी, आदी विषयावर चर्चा करण्यात आली, तसेच महाराष्ट्र राज्य नर्से...

बार्शिटाकळीत अखिल भारतीय क्हाडी साहित्य संमेलन उत्साहात.....माह्यी वऱ्हाडी मले शिकवते बोली, लेक बहिणीच्या मनी किती गुपीत पेरली

बार्शिटाकळीत अखिल भारतीय क्हाडी साहित्य संमेलन उत्साहात..... माह्यी वऱ्हाडी मले शिकवते बोली, लेक बहिणीच्या मनी किती गुपीत पेरली बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : साहित्य व बोलीभाषा संवर्धन संस्था बार्शीटाकळीद्वारा संचालित अखिल भारतीय वन्हाडी साहित्य मंच अकोला यांच्यातर्फे ६ वे अ. भा. बन्हाड़ी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. साधना काळबांडे यांची वैविधयपूर्ण वन्हाडी शब्दांची मांडणी व शैला चेडे यांचे माजघर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. वहाडी साहित्य व बोलीभाषा संवर्धनासाठी २०१५ पासून कार्य करत असलेल्या संस्थेचे वर्षभर वेगवेगळे उपक्रम सुरू असतात. वन्हाडी मायबोलीचा जागर व्हावा या हेतूने अ.भा. वन्हाडी साहित्य संमेलनाचे आयेजन केला जमते. आतापर्यंत २०५८, २०१९, २०२०, २०२२,२०२४ मध्ये पाच अ.भा. क्हाडी साहित्य संमेलने पार पडली. वरम्मान सहावे अ.भा. कडाडी साहित्य संमेलन रविवार २३ फेब्रुवारी रविवार रोजी बार्शीटाकळी येथे झाले. सकाळी ग्रंथ दिंडीने संमेलनाला सुरुवात झाली. ग्रंथ दिंडीचे पूजन भारत बोबडे , मनिषा बोबडे, गजाननराव काकड व भावेश पटेल यांच्या हस्ते पार पडले...