राशन दुकानदार जाकीर हुसैन यांनी उपलब्ध करून दिली आधार कार्ड अपडेट करण्याची सोय
राशन दुकानदार जाकीर हुसैन यांनी उपलब्ध करून दिली आधार कार्ड अपडेट करण्याची सोय
बार्शिटाकळी : येथील राशन दुकान क्रमांक ९१ एम एम हुसैनचे चालक तथा रास्त भाव दुकानदार संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष जाकीर हुसैन यांनी आपल्या राशन कार्ड धारकांना राशन कार्ड शी आधार नंबर लिंक करण्यासाठी आधार कार्ड अपडेट नसल्याने अडचणी येत होत्या व वयोवृद्ध महिला व पुरुष व लहान मुलांना अशा राशन कार्ड धारकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तहसील (आधार कार्ड सेंटर )वर जाण्यासाठी त्रास होत होता म्हणून बार्शिटाकळी येथील रास्त भाव दुकान एम एम हुसैन चे चालक जाकीर हुसैन यांनी आपल्या राशन दुकानातच आधार कार्ड अपडेट करण्याची सोय उपलब्ध करून दिली त्याबद्दल जाकीर हुसैन यांचे राशन कार्ड धारकांनी आभार मानुन आनंद व्यक्त केला
Comments
Post a Comment