बहुजनांचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.....
बहुजनांचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.....             बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :- दि. 2 नोव्हेंबर 2025: बहुजन नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी पुन्हा एकदा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार  शुद्धधन इंगळे रा. कन्हेरी (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे. तक्रारीनुसार, काही फेसबुक पेजेस आणि व्यक्तींनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध अवमानकारक, बदनामीकारक आणि समाजात तणाव निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित केले. हे व्हिडिओ 29 ऑक्टोबर 2025 रोजी सोशल मीडियावर प्रसारित झाले असून, समाजात असंतोष पसरविण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 299, 196, 357 तसेच इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 च्या कलम 3(1)(r)(s) अंतर्गत कारवाईची मा...