ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने बार्शिटाकळी येथे पत्रकार दिवस साजरा......
ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने बार्शिटाकळी येथे पत्रकार दिवस साजरा......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : आज दिनांक १६ नोव्हेंबर रोजी बार्शिटाकळी येथील विश्रामगृह येथे ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिवस साजरा करण्यात आला
यावेळी ग्रामीण पत्रकार संघांचे राज्य अध्यक्ष श्री गजानन वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुका अध्यक्ष श्री प्रदीप गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला . तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून ग्रामीण पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारिणी मध्ये अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी मुफीज अहमद खान तर जिल्हा महासचिव पदी शेख ईमाम शेख फय्याज,तालुका उपाध्यक्ष पदी रामदत्त सावजी राठोड, दिलीप जाधव, यांची व तालुका संघटक आझम खान असलम खान, तालुका प्रसिध्दी प्रमुख पदी श्रावण रामदास भातखडे, तालुका सहसचिव पदि इरफान अहमद शेख तर बार्शिटाकळी शहराध्यक्ष पदी शेख गुफरान शेख इरफान व शहर उपाध्यक्ष पदी नदीम खान नसीम खान , यांची निवड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री गजानन वाघमारे व तालुका अध्यक्ष श्री प्रदीप गावंडे यांनी केली प्रमुख उपस्थिती मध्ये संदिप चव्हाण होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख इमाम यांनी केले तर आभार प्रदर्शन रामदत्त राठोड यांनी केले
ग्रामीण पत्रकार संघाच्या नवनियुक्त कार्यकारिणीचे स्वागत.....
अजनी येथील ग्रामपंचायत सदस्य श्री संदिप चव्हाण यांनी ग्रामीण पत्रकार संघाच्या नवनियुक्त बार्शिटाकळी तालुका कार्यकारिणीचे स्वागत केले...
Comments
Post a Comment