समाधान जाधव यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान... गटशिक्षणाधिकारी रतनशिंग पवार

समाधान जाधव यांचे शिक्षण क्षेत्रात               
मोठे योगदान
              गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार

शिक्षण विस्तार अधिकारी समाधान जाधव यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न


बार्शीटाकळी शिक्षण विस्तार अधिकारी समाधान जाधव यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे असे प्रतिपादन बार्शीटाकळी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी रतन सिंग पवार यांनी केले ते समाधान जाधव यांची निवृत्ती कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून बोलत होते पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी समाधान मखराम जाधव हे 30 एप्रिल 2022 रोजी आपल्या नियमित वयामाना नुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचे सेवा निवृत्ती बाबत कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी बार्शीटाकळी पंचायत समिती सभागृहामध्ये करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बार्शीटाकळी पंचायत समितीचे उपसभापती संगीता मनोज जाधव बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी रमेश चव्हाण कक्ष अधिकारी दिलीप शिरसाठ हे होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख दिलीप आवटे यांनी केली यावेळी समाधान जाधव यांचा बार्शीटाकळी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा चे मुख्याध्यापक शिक्षकांच्या वतीने शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला समाधान जाधव यांची मोठ्या प्रमाणात सेवा बार्शीटाकळी पंचायत समिती मध्ये झाली असून त्यांच्या कार्यकाळात बार्शिटाकळीटा   पंचायत समितीमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आहे यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल देशमुख प्रभारी विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर , मदन धात्रक , शंकर डाबेराव , महेश बावणे , अरुण धांडे , वसंत सेवलकर , प्रमोद जानोरकर , मनोज जयस्वाल , यांनी प्रयत्न केले यावेळी शिक्षक पतसंस्था चे संचालक अरविंद आगाशे सर , शाफिक अहेमद खान राही यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रसिद्ध कवी किशोर बळी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद जानोरकर यांनी केले या वेळी खालिद बिन वलीद शिक्षण व कल्याणकारी संस्थेच्या वतीने सुद्धा शाहिद इक्बाल खा सरफराज खान व राहुलहा खान सरफराज खान यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले  या वेळी राजेश पातळे सर यांनी राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांचे जयंतीनिमित्त भजनाचे सादरीकरण केले यावेळी मुख्याध्यापक प्रकाश राठोड , कैलास केदार , संतोष देशमुख , राजू ठाकरेे , प्रशांत पुरानिक, काजी रिजवान उद्दीन हबीब उद्दीन मोहम्मद शाकीर , ब्रह्म सिंह राठोड, विशाल पाटील ,मोहन पोपुलवर ,व बार्शीटाकळी पंचायत समिती गट साधन केंद्र मधील सर्व विषय साधन व्यक्ती व विशेष शिक्षक उपस्थित होते यावेळीकार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रसिद्ध कवी किशोर बळी यांनी केले

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे