प्रथम हज प्रशिक्षणाचे आयोजन 10 मे रोजी लाल बंगला बैदपुरा अकोला येथे केले आहे........ मो. शफीक अहमद खान यांची महाराष्ट्र राज्य हज कमिटीकडून प्रशिक्षक म्हणून निवड...

प्रथम हज प्रशिक्षणाचे आयोजन 10 मे रोजी लाल बंगला बैदपुरा अकोला येथे 
मो शफीक अहमद खान यांची महाराष्ट्र राज्य हज कमिटीकडून प्रशिक्षक म्हणून निवड

बार्शीटाकळी सन 2022 च्या हज यात्रा करिता प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य हज कमिटीकडून अकोला जिल्हा परिषदेचे शिक्षक हाजी मो शफीक अहमद खान अजीज खान यांची सन 2022 करिता खादी मूल हुज्जाज म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच अकोला जिल्ह्यातील सन 2022 मध्ये हज यात्रा करिता जाणारे भावी हाजी लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा त्यांची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे तसेच सन 2022 करिता ज्या मुस्लीम बांधवांची हाज यात्रेसाठी हज कमिटी कडून नम्बर लागले आहे त्या सर्व हज यात्रींचे प्रशिक्षण शिबिर मंगळवारी 10 मे रोजी बैदपुरा परिसरातील लाल बंगला फंक्शन हॉल येथे सकाळी 9,30 ते 5 वाजे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे सदर प्रशिक्षणात सन 2022 मध्ये अकोला जिल्ह्यातील हज यात्रा करिता जाणारे सर्व भावी हाजी लोकांची उपस्थिती अनिवार्य आहे अशे अहवान मरकजी खादिमुल हजजाज वेल्फेअर सोसायटी बैद पुरा अकोला तसेच प्रशिक्षक मोहम्मद शफीक अहमद खान यांच्या वतीने करण्यात आले आहे,

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,