मंगरुळपीर नगर पालिकेचा मुख्याधिकारी वाशीम ACB च्या जाळ्यात…वाशीम जिल्ह्यात खळबळ…

मंगरुळपीर नगर पालिकेचा मुख्याधिकारी वाशीम ACB च्या जाळ्यात…वाशीम जिल्ह्यात खळबळ… 
 
वाशीम – मंगरुळपीर नगरपरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी ह्यांना माध्यस्ताचे मार्फत एक लाख रुपये लाच स्वीकारताना वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दिपक नारायण इंगोले वय 42 वर्ष मंगरुळपीर मुख्याधिकारी, वर्ग 2, नगर परिषद कार्यालय,येथे कार्यरत तर त्यांचा मध्यस्ती असलम जमिल सिद्दिकी
वय-55 खाजगी इसम रा.मंगरुळपिर जि. वाशिम याने लाचेची रक्कम स्वीकारली.

तक्रारदार यांच्या मंगरुळपिर शहरातील सर्वे क्र 227अ मधील प्लॉट क्रं.52 मध्ये काही लोकांनी कॅबिन टाकून अतिक्रमण केले होते, सदरचे प्लॉट वरील अतिक्रमण काढून देण्याकरिता अर्जदार यांनी आ.लो.से यांचे कडे रीतसर अर्ज केला असता आ.लो.से क्रं.1 यांनी अतिक्रमण काढून देण्याच्या बदल्यात आ.लो.से क्रं.2 खाजगी इसम यांचे मार्फतिने पडताळणी कार्यवाही दरम्यान 100000/- रु. ची लाचेची मागणी करून सापळा कार्यवाही दरम्यान आ.लो.से क्रं 2 नमूद खाजगी इसम यांनी 100000/-रु लाचेची रक्कम आ.लो.से क्रं .1 यांच्या करीत पंचासमक्ष स्वीकारले वरून दोन्ही आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी यांचे विरुद्ध पोस्टे मंगरुळपिर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मार्गदर्शन –
▶मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
श्री.देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
श्री. गजानन शेळके पोलीस उपअधीक्षक.ला.प्र.वी.वाशीम
▶️ सापळा व तपास अधिकारी – श्रीमती ममता अफूने, पोलीस निरीक्षक ला.प्र.वी.वाशिम.
▶️ सापळा सह अधिकारी

श्री. गजानन शेळके पोलीस
उपअधीक्षक.ला.प्र.वी.वाशीम
श्री.महेश भोसले पोलीस
निरीक्षक ला.प्र.वी.वाशिम.
▶ कारवाई पथक –
सपोउपनी बेलोकार, पोहवा आसिफ शेख, नितीन टवलारकर,पोना विनोद अवगळे योगेश खोटे,
▶ आलोसे यांचे सक्षम अधिकारी — मा.प्रधान सचिव, नगरविकास मंत्रालय , मुंबई 




Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....