गोठाण जवळील श्मशान भुमित अनुजाती-जमातीतील लोकांना प्रेत जाळण्यास मज्जाव....

गोठाण जवळीत अनुजाती जमातीतील लोकांना प्रेत जाळण्यात मज्जाव 

प्रतिनिधी , बार्शिटाकळी ,
बार्शिटाकळी तालुक्यातील गांव लोहगड येथील गोठाण जवळीत पिढयान पिढया अनुजाती - जमातीच्या पारंपारिक स्मशान भुमी मध्ये प्रेत दहन करीत असत परतुं दि , २४ , ४ ,२०२२ ला गावातीलं रमाबाई  सुलताने नामक महिलेचे दुःखद निघन झाले असता गांवकरी यांनी  अंत्य विधी साठी अडथळा आणून अंत्य वीधी न करण्यासाठी मज्जाव केला.
 लोहगड गांवातील सर्व अनु -जाती जमातील नागरिकांनी पालकमंत्री बच्चुभाऊ कंडू  कडे सदर प्रकरणाची तक्रार केली लोहगड येथील गोठाण जवळ पिढया पिढया अनु जाती जमाती पांरपारिक स्मशान भुमी मध्ये मृत  प्रेताचे अंत्य विघी करत होते ,परतुं दि , २९ , ४ ,२०२२ ला गावातील रमाबाई मद्युकर सुलताने नामक महिलेचे दुःखद निघन झाले असता अनु ,जाती जमाती लोकांनी प्रेतचे अंत्यवीघी साठी लाकडे टाकले असता गांवातील उपसरपंच जाधव त्याच स्मशान भुमी जवळ सहा महिना पूर्वी अवैध दारूच्या विक्री साठी अतिक्रमण करून झोपडी बाघणाऱ्या सुनिल जाधव व्यवसाय हातभट्टीची दारु काढून विकणे हे दोघे जण आले . प्रेताच्या अंत्यविधी साठी लाकडे टाकणा-या लोकाना दोघांनी दमदाटी व शिवीगाळ करून कॉलर पकडून लाकडे उचलण्यांसाठी दबाव आणला व धमक्या दिल्या दोघांनी मृतकाचे अंत्य विधीसाठी आणलेले लाकडे इतर ठीकानी जंगलात टाकले . गांवातील उपसरपंच यांनी पदाचा गैर वापर करून अनुजाती- जमातीच्या पिढयान पिढया असणाऱ्या स्मशान भुमीत प्रेत जाळण्यात मज्जाव केला . या झालेल्या घाटनेमुळे नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे . त्याबदल त्यांनी खासदार सजय भाऊ घोत्रे , आमदार रणजीत पाटील , जिल्हाधिकारी अकोला , पोलिस अधीक्षक , मुंख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद , तहसिलदार बार्शिटाकळी, व ठाणेदार बार्शि टाकळी यांना
 तक्रार दाखल केली आहे त्याच्या जीवाला धोका आणी भीतीचे वातावरण आहे . त्या श्मशान भुमीत प्रेत अनु , जाती जमातींच्या लोकाचे प्रेत जाळण्यात येईल तरी पुढे वाद होऊ शकते . या आधी तांडयातील लोकांनी गांवात येऊन अनु जाती जमातीच्या लोकांना मारहाण केली व त्यांची घर जाळली तरी या प्रकरणाचा गाभीर्याने विचार होवून यांची चौकशी करुन योग्य ती दोषीवर कारवाई करण्यात यावी  तसेच स्मशान भुमीला वॉल कंपाऊड किंवा तार कंपाऊड साठी आपल्या स्तरावर मंजुरी मिळावी , आतापर्यत कोणत्याच प्रकारची ठोस  कारवाई न झाल्या मुळे कुठे पाणीं मुरले आहे अंशी अनु जाती जमाती  लोका मध्ये संभ्रात आहे त्या बदल कारवाई न झाल्यास मुळे  लोहगड चे अनु जाती जमातीचे नागरिकांनी दि , १८ मे गुरुवार रोजी तहसिल कार्यालय बार्शिटाकळी येऊन निवेदन देण्यात आले .
 त्या निवेदनात दिनेश सोळके , शिवाजी डाबेराव , देवकाबाई घाडसे , प्रभाकर घाडसे , अजय सरकटे , गोपाल राठोड , आदी बहूसंख्येने नागरिकांच्या स्वाक्षरी निवेदनात आहे .
छाया , बार्शिटाकळी तहसिल कार्यालयात महिला व नागरिक यांची उपस्थित 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे