काही असो आई हे असंख्य हत्तीच बळ आहे. मातृदिनाच्या शुभेच्छा ! सार्वजनिक जीवनात आईच्या अनुपस्थित आईसारख प्रेम अंजलीताई आंबेडकर आणि रेखाताई ठाकुर यांनी दिले.... गोविंद दळवी....

आज मातृदिन
हि माझी आई अक्षर ओळख अजिबात नाही पण कोणताच हिशेब चुकला नाही. मी ३ वर्गात असतानाच माझ्या बापाचं निधन झालं. त्यानंतर माझ्या आईने आम्हाला शिकवलंय.
बापाच्या नंतर कुटुंबावर अठरा विश्व दारिद्र्यासह अनेक संकटे आलीत परंतु आईने आम्हाला त्याची झळ पोहोचु दिली नाही. मी काय करतो याची तिला फारशी माहिती नाही.
पण कुणी विचारलंच पोरगं काय करते ? तर माञ नक्कीच सांगते "प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात काम करते" म्हणून.
हल्ली फारशी भेट होत नाही परंतु फोटोत बाजूला बसलेल्या बाईसाहेब केव्हाही फोन करतात त्यांना मी कुठे असेल याच्याशी काही देणेघेणे नसते ते थेट फोन करून धमकावतात हालो मामा जेवले का ? कव्हा येणार हा ? काय करायले ?  या धतींगशाहीत माञ आई लगेच मध्यस्थी करते आणि विचारते कामात आहेस का ? जेवलास की , कुठे आहेस ? काळजी घे. घरी यायचा विचार आहे का नाही ?
आपलं ठरलेलं शिव्या खाण्याच वाक्य ' थोडा वेळाने फोन करतो'! थोडा वेळ काही संपत नाही परत दिवस उजाडतो परत शिव्या, धमक्या सुरू .
 आईला फादर डे,मदर डे,बर्थडे, फेसबुक, वाॅट्सएप , ट्विटर, इंस्टाग्राम किंवा राजकारण वगैरे काही माहिती नाही. पण फोटो काढताना माञ थांब रे पदर घेऊ दे हे माञ दरडाऊन सांगितले आणि आईचं बघुन माझी भाची संघर्षा तिने तर टाॅवेलच डोक्यावर घेतला. मी हे जे लिहिले हेही तिला माहित नाही. पण दारावर जर कुणी आला तर बाकी काही देत नाही जेऊ घातल्या शिवाय माञ जाऊ देत नाही. देव धर्म हा भाग वेगळा पण परिश्रमा शिवाय काहीच मिळत नसते हा तिच्या जिवन जगण्याचा सिध्दांत आहे. 
काही असो आई हे असंख्य हत्तीच बळ आहे. 
मातृदिनाच्या शुभेच्छा ! 
सार्वजनिक जीवनात आईच्या अनुपस्थित आईसारख प्रेम  अंजलीताई आंबेडकर आणि रेखाताई ठाकुर यांनी दिले. सर्व आईंना शुभेच्छा !

गोविंद दळवी
९८८१२८३८०२ 

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,