कु.पायल शंकर पवार ची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचे अजनी वासीन्यांनी केले जंगी स्वागत
कु.पायल शंकर पवार ची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचे अजनी वासीन्यांनी केले जंगी स्वागत
प्रतिनिधी , बार्शिटाकळी ,
अंजनी खुर्द वासीयांनी केले जंगी स्वागत.
बार्शिटाकळी तालुक्यातील अजनी खुर्द येथील ब़ंजारा समाजातील सामान्य कुटुंबातील बार्शिटाकळी येथे घाबेकर विद्यालयता इयत्ता बारावीत शिकत असलेली कु.पायल शंकर पवार हीने आपला कष्ठ व जिद्द चिकाटी मुळे यशो शिखर गाठून नेपाळ येथे मुलीच्या संपन्न झालेल्या ४०० मीटर दौड फिल्ड रनिग मध्ये चॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. आणी आता तिची आतरराष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेकरीता निवड झाली आहे. मागील वर्षी गोवा येथे मुलीच्या झालेल्या ८०० मीटर दौड फिल्ड रनिग स्पर्धेतही पायलने प्रथम अव्वल स्थान पटकावले होते. नुकतेच तिचे अंजनी खुर्द येथे आगमन झाले .असता गावकरी मंडळी यांनी तिचे जंगी स्वागत केले.
कु पायल पवार चे उत्कृष्ट कार्याबदल मुर्तिजापुर मतदारसंघाचे आमदार हरिष पिपळे यांनी त्याचे कौतुक करुन पुढच्या वाटचालीसाठी अंभिनंदन केले आहे . या वेळी पंचायत समिती उपसभापती सौ. संगीता मनोज जाधव यांचे हस्ते कुं पायल शंकर पवार यांना पुष्पगुच्छ व भेंट वस्तु देऊन भव्य स्वागत केले , त्या वेळी , वरिष्ट्र नेते सुनिल धाबेकर , सरपंच सौ सुजाता केवल राठोड, उपसरपंच सौ वर्षाताई प्रल्हाद कावरे, पोलिस पाटील सौ पद्मावती रामेश्वर कावरे, मनोज जाधव , शंकर पवार ,तथा समस्त गावक-यांची उपस्थिती होती. सामान्य कुटुंबातील पायलने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतल्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तिच्या यशाचे श्रेय ती आपले आई, वडील शंकर पवार ,व गुरुजी श्री पुरुषोत्तम बिल्लेवार सर, समर्थ अकॅडमी शेगाव यांना देत आहे.
छाया , कु , पायल पवार चे स्वागत करताना उपसभापती संगीता जाधव
Comments
Post a Comment