नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शिटाकळी येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न
नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शिटाकळी येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न
बार्शिटाकळी दि. ०५ जून २०२२ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त व अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी डॉक्टर्स सेल च्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन के बी मेमोरियल क्लीनिक बार्शीटाकळी येथे करण्यात आले. सदर कार्यक्रम श्री अशोक अमानकर साहेब अध्यक्ष अकोला जिल्हा काँग्रेस कमेटी तसेच श्री सुनील भाऊ धाबेकर साहेब अकोला जिल्हा परिषद सदस्य व सहकार नेता, यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले.
अकोला येथील सुप्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉ. गजानन भगत यांनी नेत्र रुग्णांची तपासणी केली व एकूण 150 पेक्षा जास्त नेत्र रोग तपासणी व उपचार करण्यात आले.
डॉ. तन्वीर जमाल सहाचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी अकोला यांनी शिबिराचे आयोजन केले, यावेळी शहरातले नगर अध्यक्ष महफ़ूज़ खान, डॉ मिलींद पवार, सैय्यद मीर साहेब,सैय्यद जहांगीर, अतुल पाटील अमानकर ,भूषण गायकवाड़, मोहम्मद शोएब, अजहर शाहिद, हासन शाह, बाळु भाऊ ढोरे, भारत बोबडे, तनविर ठेकेदार, अनीस इकबाल, सैय्यद आशिक गुरुजी,सैय्यद असद ,सैय्यद इमदाद (उर्फ गुड्डू) मासूम खान ,आतिफ पठान,सादिक बाबु, जनुद्दीन लीडर, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते या शिबिराचे गावातल्या सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
Comments
Post a Comment