जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्शिटाकळी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्शिटाकळी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

बार्शीटाकळी प्रतिनिधी

आज दिनांक पाच जून रविवारी बार्शी टाकळी येथील प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय गंगानगर बार्शिटाकळी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी पर्यावरण दिनानिमित्त प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय ते मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करून वृक्षारोपण करण्यात येते यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार जेठाभाई पटेल हे होते यावेळी प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय बार्शीटाकळी ची प्रमुख अरुणा दिदि यांनी उपस्थितांना वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन तसेच आजच्या काळात वृक्षांची महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले वाढत्या तापमानात एकमेव वृक्ष हे आपल्यासाठी सोयीचे आहे ते तर इतर सर्वांनी कमीत कमी आपल्या आयुष्यात एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून खालिद बिन वलीद शिक्षण व कल्याणकारी संस्था चे उप अध्येक्ष शाहिद एकबाल खान हे होते या वेळी त्यांनी ही वृक्षांची महत्व पर्यावरण बाबत मार्गदर्शन केले तसेच त्यांचे संस्थामार्फत आतापर्यंत विविध माध्यमातून व विविध उपक्रमाचे माध्यमातून हजारो वृक्ष रोपण कशाप्रकारे करण्यात आले याबाबत वस्तुनिष्ठ माहिती सांगितले तसेच सीट बोलते माध्यमातून शासकीय कार्यालय गायरान जमीन कब्रिस्तान समशान भूमी सार्वजनिक ठिकाण इत्यादी ठिकाणी कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्यात येत आहे याबाबत सविस्तर नियोजन सांगितल संस्थेच्या मार्फत नुकताच अकोला जिल्ह्यात एक पोलीस एक वृक्ष योजना राबवू संपूर्ण जिल्ह्यात पर्यावरणाचे संदेश देण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नगरसेवक श्रावण रामदास भातखडे , संतोष पंडित , शामराव सिरसाट, वर्षाताई येळवनकार , उत्तमराव येळवनकार , संगीता दीदीी , प्रमोद चोधरी , पिंटू सुरवाडे , दिनेश राठोड , महादेव चव्हाण मोहम्मद भाई , इरफान ,शेख नईमोद्दीन, वाकार खान राहुल्लाह खान ,अय्यनोद्दीन नाशिरोद्दीन ,  आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाहिद इक्बाल खान यांनी केले यावेळी पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अरुणा दिदि यांचे वतीने करण्यात आले होते

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,