हक्काचे पाणी मिळण्यासाठी जमाते इस्लामी हिंद च्या वतीने नगर अध्यक्ष बार्शिटाकळी यांना निवेदन
हक्काचे पाणी मिळण्यासाठी जमाते इस्लामी हिंद च्या वतीने नगर अध्यक्ष बार्शिटाकळी यांना निवेदन
बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी
प्रत्येक व्यक्तीचा हा अधिकार आहे की त्याला सुरक्षीत , निर्धोक , सुलभ व स्वच्छ पिण्याचे पाणी वैयक्तिक आणि घरगुती वापरासाठी मिळावे . गेल्या कित्येक वर्षापासून बार्शीटाकळीवासी आपले हक्काने पाणी मिळण्यापासून वंचीत आहेत . बार्शीटाकळी शहरातील पाणी पुरवठा योजनेकरीता शासनाने नगर पंचायतला २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे . उन्हाळा आणि त्यातही आर्द्रता अशा परिस्थितीत पाणीटंचाई तसेच बऱ्याच ठिकाणी प्रदुषित पाणी असून बार्शीटाकळी शहरामध्ये सार्वजनिक स्वास्थ्याला धोका निर्माण झाला आहे . महोदय , एकीकडे पाणी पुरवठा योजना मंजूर झाली मात्र तिचे कार्यान्वयन का होत नाही ? यामध्ये कमालीची दिरंगाई का ? हा सर्व शहरवासियांना प्रश्न पडला आहे . तरी आपण सर्वांनी मिळून ह्याबाबत लवकारात लवकर काय तो निर्णय घेऊन आम्हा बार्शीटाकळी शहरवासियांना आम्हाला आमचे हक्काचे स्वच्छ पाणी मिळवून द्यावे व आपली जबाबदारी पूर्ण करावी ही नम्र विनंती असे निवेदन जमाते इस्लामी च्या बार्शी टाकळी शाखे कडून नगर अध्यक्ष हाजी मेहफूज खान यांना देण्यात आले आहे
निवेदन देते वेळी जमाते इस्लामी हिंद बार्शी टाकळी चे अध्यक्ष डॉ मुदस्सिर उललाह खान, नसरुल्लाह खान, मुनझिर अली खान,रिजवान अहमद खान,हुसैन खान,एहसान खान, आतिफ खान,साजिद खान, सय्यद असीम,इमरान खान,उमैर खान, असिफ खान, रईस खान, मोहंमद शाकीर सर,नासीर खान आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Comments
Post a Comment