माननीय आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर व मा.आ. हरीषभाऊ पिंपळे यांच्या पाठपुराव्याला यश मुर्तिजापूर शहराचा पाणी प्रश्न सुटला
*माननीय आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर व मा.आ. हरीषभाऊ पिंपळे यांच्या पाठपुराव्याला यश मुर्तिजापूर शहराचा पाणी प्रश्न सुटला*
मतदारांच्या समस्या सतत निराकरणासाठी भाजपा लोकप्रतिनिधी कार्यतत्पर असतात त्याचा प्रत्यय आज पुन्हा आला. मुर्तीजापूर शहर तसेच खारपाण पट्ट्यातील ६४ खेड्यांना सतत भेडसावणाऱ्या पाणी टंचाई पासून कायमस्वरूपी मुक्त करून खांबोरा पाणी पुरवठा पाईप लाईन द्वारे सुरु करण्याच्या कामाची पाहणी माननीय आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला श्री रणधीर सावरकर व माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआपप्पा पिंपळे यांनी संयुक्त रित्या आज केली.
काटेपूर्णा धरणातून खांबोरा येथे नदी द्वारे पाणी होत त्यामुळे उन्हाळ्यात या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता तसेच पाण्याचा अपव्यय होत होता. *या साठी माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी तत्कालीन मुख्यमत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी करून पाणी टंचाई योजनेंतर्गत १९.९१ कोटी रुपये मंजूर करून आणले.*
मुर्तीजापूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा तसेच खारपाण पट्ट्यातील ६४ गावांना अखंडित व नियमित काटेपुर्णा धरणातून पाणी पुरवठा व्हावा तसेच अकोला शहरातील उद्योग धंदे सुरळीत चालावे व त्यांना पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा या साठी काटेपुर्णा धरण ते खाम्बोरा बंधार्यापर्यंत ६०० मी.मी. व्यासाची आणि १८.४८ कि.मी. लांबीची विशेष पाईप लाईन ची मागणी करून आपली मागणी विशेष योजनेंतर्गत मंजूर करून आणून सततची पाणी टंचाई निकाली काढण्यासोबत पाण्याचा होणारा अपव्यय तसेच वेळेची बचत करून या भागातील कायमस्वरूपी पाणी टंचाई दूर करण्यात यश प्राप्त केले. आज मा.आमदार रणधीरभाऊ सावरकर व मा आमदार हरीषभाऊ मा. पिंपळे यांनी संयुक्त रित्या खांबोरा पाणी पुरवठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या वेळी जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या अडचणी, उपाय योजनेचे महत्व तसेच महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले. या योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजूर केलेल्या कामाची पूर्तता करून पंतप्रधान मा. ना. श्री नरेंद्रजी मोदी यांचा घर घर पाणी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची संकल्पनेला साकार रूप देण्याचे काम भाजपा लोकप्रतिनिधींनी केले आहे. काटेपुर्णा धरण ते मुर्तीजापूर MIDC स्वतंत्र पाणी पुरवठा सुरु आहे तसेच मुर्तीजापूर शहराला सुद्धा पाणी पुरवठा होऊन पाणी टंचाई भासणार नाही असा प्रामाणिक प्रयत्न मा.आ. रणधीरभाऊ सावरकर व मा.आ. हरीषभाऊ पिंपळे यांनी केला आहे.
या पाहणी वेळी मा.आ. रणधीरभाऊ सावरकर व मा. आ. हरीषभाऊ पिंपळे यांचे समवेत जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता गव्हाणकर साहेब, उपअभियंता राठोड साहेब, शाखा अभियंता निखिल राऊत साहेब, ज्ञानेश्वर पाटील पोटे, हर्षल साबळे, पंकज वाडेवाले, अंबादासभाऊ उमाळे, जय पाटील ठोकळ, रविकांत राऊत, सागर तायडे, प्रदीप गांजरे, गिरीश जोशी, विनोद भाऊ वाघमारे, हर्षवर्धन देशमुख, निलेश हांडे, मानखैरे साहेब तसेच पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment