अखेर वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी च्या मागनीला यश
अखेर वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी च्या मागनीला यश
बार्शीटाकळी प्रतिनिधी
बार्शिटाकळी तालुक्यातील निबी येथील सतीश भाऊराव शिरसाट हा युवक अकोला कडुन निंबी कडे येत असतांना आळंदा फाट्या जवळ 1 जुन रोजी वादळात रस्त्यावरील निंबाच झाड सतीश भाऊराव शिरसाट याच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता त्याच्या घरात एकुलता एक कमावता व्यक्ती गेल्याने त्याच्या मृत्यूची दखल वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी ने घेत त्याला आर्थिक मदतीची मागणी केली होती त्या निवेदनाची दखल घेत शासनाने सतीश भाऊराव शिरसाट याच्या परीवाराला 4 लाख रुपयांची मदत बार्शिटाकळीचे तहसीलदार श्री गजानन हामद साहेब यांनी त्यांच्या बॅक खात्यात जमा केली यावेळी सतीश भाऊराव शिरसाट याच्या परीवाराने वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनीक, जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, गोबा शेठ, न. प. उपाध्यक्ष सुरेश जामनिक, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, समाज सेवक अनीलभाऊ धुरंधर, सै. अबरार, संदेश ईगळे, रक्षक जाधव, गणेश दहात्रे,मो. तौफिक, दिनेश जामनिक आदि मान्यवरांचे आभार मानले
Comments
Post a Comment