वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी न प चे आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाठ यांची नगरपंचायत बार्शिटाकळी च्या गटनेते पदि निवड
*वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी न प चे आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाठ यांची नगरपंचायत बार्शिटाकळी च्या गटनेते पदि निवड*
बार्शिटाकळी प्रतिनिधी
आज दिनांक 08/07/2022 रोजी बार्शीटाकळी शहरा मध्ये वरीष्ठ नेता नईमोददीन भाई यांचे घरी पक्षाची मिटिंग चे आयोजन करण्यात आले होते, सदर मिटिंग ला वंचित बहुजन आघाडी चे अकोला जिल्हा अध्यक्ष आद. प्रमोदजी देंडवे तसेच प्रदिप ऊर्फ बबलु भाऊ शिरसाठ... किशोर भाऊ जामणीक... शरद भाऊ इंगोले..प्रभारी तालुका अध्यक्ष दादारावजी सुरडकर... जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, युवा तालुका अध्यक्ष अमोल जामणीक.. शहर अध्यक्ष अझहर पठाण.. गोबा सेठ.. रागीब हाजी साहेब.. आशीक हाजी साहेब.. सै. रियासत.. ईमरान खान.. नगर सेवक नसीम खान मास्टर... न. प. उपाध्यक्ष सुरेश जामनिक.. आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाठ.. नगरसेवक श्रावण भातखडे... अनिल धुरंधर.. सैय्यद अबरार..तसेच सनी धुरंधर.. मिलिंद करवते.. मनिष वाहुळे.. तसेच पक्षाचे आजी माजी पदाधिकारी तथा कार्यकर्ते हे हजर होते... तेव्हा बार्शीटाकळी न. प. चे वंचित बहुजन आघाडी चे उपाध्यक्ष तथा गटनेते श्री. सुरेश सुखदेव जामणीक यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोदजी देंडवे साहेब यांचे कडे कामाचा खुप व्याप असल्यामुळे त्यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला, सदरचा राजीनामा जिल्हा अध्यक्ष यांनी स्विकारुन नगरसेवक /नगरसेविका यांना विश्वासात घेऊन आरोग्य सभापती श्री. सुनिल विठ्ठलराव शिरसाठ यांची वंचीत बहुजन आघाडी च्या गटनेते पदी निवड केली त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचेवर बार्शिटाकळी शहरातुन अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत
Comments
Post a Comment